AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात अचानक गायब, मग उन्हाळ्यातच का बाहेर येतात साप?

Snake Facts: अनेकदा तुम्ही पाहीलं असेल की उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात साप तुम्हाला कुठे नं कुठे हमखास दृष्टीस पडतो. मग हिवाळ्यात साप अचानक कुठं गायब होतात आणि नंतरच्या ऋतूत ते का बाहेर येतात?

हिवाळ्यात अचानक गायब, मग उन्हाळ्यातच का बाहेर येतात साप?
साप उन्हाळा आणि पावसाळ्यातच का दिसतातImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 03, 2026 | 2:47 PM
Share

Snake Facts: साप म्हटलं की अनेकांची पाचावर धारण बसते. जगभरात सापाच्या तीन हजाराहून अधिक प्रजाती आहेत. त्यातील काही तर अत्यंत विषारी आहेत. दंश करताच माणसाचा काही सेकंदात मृत्यू होतो. एका अहवालानुसार, भारतात सापाच्या एकूण 69 प्रजाती आहेत ज्या अत्यंत खतरनाक आहेत. यामध्ये 29 समुद्रातील साप आहेत. तर 40 जमिनीवरील आहेत. यामध्ये किंग कोबरा, करेत आणि ब्लॅक माम्बा यांचा समावेश आहे. पण साप उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्वाधिक दिसतात पण ते हिवाळ्यातच का गायब होतात? काय आहे त्यामागील कारणं?

शास्त्रज्ञांच्या मते, सापांची झोपेची वेळ ही वातावरण, तापमान आणि त्यांचे भक्ष्य यावर अवलंबून असते. थंडीच्या काळात साप हे सुरक्षित ठिकाणी झोपतात. सापाचे रक्त हे थंड असते. त्यामुळे त्यांचे शरीर हे तापमान स्वतः नियंत्रीत करू शकत नाही. त्यामुळे ऐन हिवाळ्यात त्यांच्यावर सुस्ती चढते. ते अधिक ऊर्जा खर्ची घालत नाहीत. ते एखाद्या बिळात, दगडांखाली अथवा दाट झाडीत लपून बसतात. हिवाळ्यात साप हे कित्येक आठवडा अथवा महिनाभर झोपतात. त्याला हायबरनेशन, थंडीतील झोप असे म्हणतात. तापमान अनुकूल झाल्यावर, उष्णता वाढल्यावर साप सक्रिय होतात. ते दिवसा कमी आणि रात्री जास्त दिसतात. कारण त्यांना थंड वातावरण आवडते.

साप झोपलेला असताना त्याच्या श्वासाची गती आणि लय मंदावते. एखादा आवाज अथवा हालचालीवर ते लागलीच प्रतिक्रिया देत नाहीत. उन्हाळ्यात वातावरण अधिक उष्ण असल्याने साप दिवसा बाहेर पडत नाहीत. 10 ते 12 तास आराम करून ते रात्री बाहेर पडतात. तर पावसाळ्यात पावसामुळे आणि थंडपणामुळे ते दिवसा बाहेर पडत नाहीत. तर रात्री सावज टिपण्यासाठी ते बाहेर पडतात. पण जसे तापमान वाढते तसे साप बिळात लपतात. हिवाळ्यातील तीन महिन्यात ते अनेक दिवस काही न खाता जिवंत राहू शकतात.

गाढ झोपेचे रहस्य

सापाची झोप ही साधारणपणे 12 ते 16 तास इतकी असते. पण हिवाळ्यात ती अधिक वाढते. वाळवंटातील साप इतर सापांपेक्षा वेगळे वागतात. ते उन्हाळी झोप घेतात. उन्हाळ्यात दिवसा आणि रात्री सुद्धा उष्ण वातावरण असतात. त्यामुळे ते सुरक्षित आणि थंड ठिकाणी ताणून देतात. त्यामुळे भीषण उन्हाळ्यात ते जिवंत राहतात. या झोपेच्या काळात सापाची त्वचा बदलण्याची प्रक्रियाही सुरू होते. सुरक्षित ठिकाणी साप कित्येक दिवस झोपेतून उठत नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. तर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सावज शोधण्यासाठी ते बाहेर येतात.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त