
विदेशात प्रवास करणं हा एक रोमांचक अनुभव असतो. पण यासाठी फक्त पासपोर्ट असून भागत नाही, तर इतर महत्त्वाचे कागदपत्रंही बरोबर असणं गरजेचं असतं. हे डॉक्युमेंट्स तुमच्या ओळखीची खात्री करतात आणि कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत तुमचं संरक्षण करतात. विमानतळावर किंवा परदेशात प्रवेश करताना जर एकही आवश्यक कागद सापडला नाही, तर तुमचं संपूर्ण प्लॅन कोलमडू शकतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्रिपवर जाताना कोणते 5 डॉक्युमेंट्स नेहमी जवळ ठेवावेत, ते जाणून घेऊया.
विदेशात जाण्यासाठी वैध पासपोर्ट ही सगळ्यात मूलभूत गरज आहे. तुमचा पासपोर्ट किमान 6 महिने वैध असावा आणि त्यामध्ये 2 ते 4 पानं रिकामी असणं आवश्यक आहे. यामुळे व्हिसा व इमिग्रेशन स्टॅम्प सहजपणे लागतो. तसेच, पासपोर्टची फोटोकॉपी आणि डिजिटल कॉपी (Google Drive किंवा ईमेलमध्ये) सेव करून ठेवा.
बहुतेक देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसा लागतो. काही देश व्हिसा ऑन अरायव्हल देतात, पण बर्याच वेळा तुम्हाला आधीच व्हिसा मिळवावा लागतो. व्हिसाचे नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा. कनेक्टिंग फ्लाइट असल्यास ट्रान्झिट व्हिसा लागतो का, हेही तपासा.
हॉटेल बुकिंग, करंसी एक्सचेंज किंवा इमरजन्सीच्या वेळी दुसरा ओळखपत्र उपयोगी ठरतो. तुमच्याकडे यापैकी एक असणं आवश्यक आहे:
1. ड्रायव्हिंग लायसन्स
2. आधार कार्ड
3. पॅन कार्ड
4. मतदार ओळखपत्र
4. बुकिंग प्रूफ
विमानतळ किंवा इमिग्रेशनच्या वेळी तुमच्याकडून ट्रिपचा तपशील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे प्रूफ प्रिंट आणि डिजिटल दोन्ही स्वरूपात ठेवा:
1. फ्लाइट तिकीट (रिटर्न तिकीटसह)
2. हॉटेल बुकिंग कन्फर्मेशन
3. ट्रिपचा तपशील / इटिनरेरी
5. ट्रॅव्हल इन्शुरन्स
शेंगेन देशांसह अनेक देशांमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स आवश्यक आहे. ही पॉलिसी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, फ्लाइट रद्द होणं, सामान हरवणं यासारख्या प्रसंगांमध्ये आर्थिक मदत करते. इन्शुरन्स पॉलिसीची अटी आणि कव्हरेज नीट वाचा, आणि कंपनीचा इमर्जन्सी नंबर जवळ ठेवा.
* सर्व डॉक्युमेंट्सची फोटोकॉपी/स्कॅन करून Google Drive किंवा ईमेलमध्ये सेव करा.
* काही देशांमध्ये कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते.
* आपल्या देशाच्या दूतावासाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक जवळ ठेवा.