उज्जैनमध्ये रात्री कोणताही मुख्यमंत्री का राहू शकत नाही? थेट साम्राज्य नष्ट होतं, काय आहे श्रद्धा?

मध्य प्रदेशातील उज्जैनला हिंदू धर्मात खूप विशेष महत्त्व मानले जाते. उज्जैनला महाकाल नगरी म्हणूनही ओळखले जाते. भगवान महाकाल यांच्या दर्शनासाठी दूरदूरून भाविक येतात. मात्र या शहराची एक आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे कोणताही मुख्यमंत्री किंवा उच्च पदाचे व्यक्ती इथे रात्री राहू शकत नाही. त्यामागे नेमकी काय श्रद्धा आहे जाणून घेऊयात.

उज्जैनमध्ये रात्री कोणताही मुख्यमंत्री का राहू शकत नाही? थेट साम्राज्य नष्ट होतं, काय आहे श्रद्धा?
उज्जैनमध्ये रात्री कोणताही मुख्यमंत्री का राहू शकत नाही? थेट साम्राज्य नष्ट होतं, काय आहे श्रद्धा?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2025 | 3:35 PM

मध्य प्रदेशातील उज्जैनला हिंदू धर्मात खूप विशेष महत्त्व मानले जाते. उज्जैनला महाकाल नगरी म्हणूनही ओळखले जाते. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथे आहे. धार्मिक शास्त्रांमध्ये उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर मोक्ष देणारे मानले जाते आणि येथे दर्शनासाठी दूरदूरून भाविक येतात. या शहरात रात्री कोणताही राजा किंवा मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदावरील व्यक्ती राहू शकत नाही. कारण त्यामागे एक श्रद्धा मानली जाते. चला जाणून घेऊयात.

उजैनमध्ये रात्री मुख्यमंत्री का राहत नाहीत?

धार्मिक मान्यतेनुसार, महाकालला उज्जैनचा राजा म्हटले जाते आणि तो येथील लोकांचे रक्षक देखील. म्हणून कोणताही दुसरा उच्च पदावरील व्यक्ती तिथे राहू शकत नाही. त्यामुळे कोणताही मुख्यमंत्री देखील तिथे रात्री राहत नाही. असे मानले जाते की जर कोणताही मुख्यमंत्री रात्री उज्जैनमध्ये राहिला तर त्याचे संपूर्ण राज्य नष्ट होते. जरी याचा कोणताही पुरावा नसला तरीही या त्याचे अनुभव आल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. म्हणून कोणताही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान इथे रात्री मुक्काम करत नाहीत. दर्शन घेतल्यानंतर ते उज्जैन सोडतात. असे मानले जाते की विक्रमादित्याच्या राजवटीनंतर कोणताही राजा उज्जैनमध्ये रात्री मुक्कामास थांबला नाही.

उज्जैन महाकालेश्वर मंदिर

भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर शिवभक्तांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. याला “दक्षिणमुखी” ज्योतिर्लिंग म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि ते उज्जैन शहराचे मुख्य देव आहेत. महाकालेश्वर मंदिर त्याच्या भस्म आरतीसाठी खूप प्रसिद्ध मानले जाते. ज्यामध्ये भगवान शिव चितेच्या राखेने सजवले जातात.

महाकालेश्वर मंदिराला खास बनवणाऱ्या गोष्टी:

स्वयंभू शिवलिंग:- या मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग स्वयंभू मानले जाते. याचा अर्थ असा की ते स्वतःहून प्रकट झाले आहेत. कोणीही स्थापित केलेले नाही.

दक्षिणमुखी शिवलिंग:- महाकालेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंग दक्षिणेकडे तोंड करून आहे, जे इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळे आहे. या मंदिराच्या गर्भगृहात ओंकारेश्वर शिवाची मूर्ती देखील स्थापित आहे.

भस्म आरती:- भस्म आरती महाकालेश्वर मंदिरात केली जाते, जे जगातील एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे ही प्रथा अजूनही चालू आहे.

नागचंद्रेश्वर मंदिर:- मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वर मंदिर आहे, जे वर्षातून फक्त एकदाच नागपंचमीच्या दिवशी दर्शनासाठी उघडते.

गणनेचे केंद्र:- प्राचीन काळात भारतीय काळाची गणना करण्यासाठी महाकालेश्वर मंदिर हे मध्यवर्ती बिंदू मानले जात असे.