समुद्रात मिळाला हजारो वर्षांपूर्वीचा तो प्रचंड मोठा खजाना, पुरातत्व शास्त्रज्ञांना धक्का, धर्मग्रंथांमध्ये ही होता उल्लेख
पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे, समुद्राच्या तळाशी मोठा खजाना हाती लागला आहे. समोरच दृश्य पाहून त्यांना देखील मोठा धक्का बसला आहे, विशेष म्हणजे याबाबत धर्मग्रंथांमध्ये देखील उल्लेख आढळून येतो.

अनेकदा पुरातत्त्व शास्त्रज्ञांना शोध घेता-घेता अशा काही वस्तू सापडतात ज्याची त्यांनी कधीही कल्पना केली नसेल. मात्र विचार करा जर अशा गोष्टी आपोआप समोर आल्या तर? हा इतिहासकारांसाठी एक सुखद धक्का असतो. काहीशी अशीच एक घटना मिस्रच्या अलेक्झेंड्रिया शहरात घडली आहे. या शहरामध्ये असलेल्या एका प्राचीन बंदरामध्ये शोध कार्य सुरू असताना इतिहास तज्ज्ञांच्या हाती मोठा खजाना लागला आहे. यूरोपीयन अंडरवॉटर आर्कियोलॉजी संस्था (IEASM) च्या वतीनं समुद्राच्या आत खोल खोदकाम सुरू होतं, यावेळी त्यांना तिथे तब्बल 2000 वर्ष जुनी आणि गूढ वस्तू सापडली आहे, त्यामुळे आता प्राचीन इतिहास उजेडात येण्याची शक्यता आहे.
ही वस्तू दुसरी-तिसरी काही नसून एक 2000 वर्ष जुनी शाही मनोरंजन नौका आहे. ही नौका इतिहास तज्ज्ञांना अलेक्झेंड्रियाच्या जुन्या बंदराजवळ असलेल्या पोर्टस मॅग्रस या ठिकाणी समुद्रात खोदकाम सुरू असातना आढळून आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही नौका तब्बल 2000 वर्ष जुनी आहे, मात्र तरी देखील ही खूपच सुस्थितीमध्ये आढळून आली आहे, या बोटीबद्दल माहिती देताना इतिहास तज्ज्ञांनी सांगितले की ही नाव खूप जुनी आहे, मात्र तरी देखील चांगल्या अवस्थेमध्ये आहे. ही नाव तब्बल 115 फूट लांब आणि 23 फूट रूंद आहे. या नावेमुळे इतिहासामधील अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता आहे.
इतिहास तज्ज्ञांच्या मते ही नाव एक थालामागोस आहे. म्हणजे अशी नाव ज्या नावेचा उपयोग दोन हजार वर्षांपूर्वी रोमन काळात श्रीमंत लोक मनोरंजनासाठी करत होते, अशा बोटींवर त्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम, जेवणाचे कार्यक्रम आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात यायचं, अशा नावेवर खास पाहुण्यांसाठी झाकलेले जेवण कक्ष देखील होते. IEASM चे डायरेक्टर फ्रॅंक गोडियो यांच्यामते ही नाव दोन हजार वर्षांपेक्षाही जुनी आहे, या नावेला त्या काळात अतिशय सुंदर अशा पद्धतीने सजवण्यात येत होतं. हे पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मिळालेलं मोठ यश मानलं जात आहे. या बोटीचा उल्लेख जुन्या काळातील रोमच्या अनेक धार्मीक तसेच सास्कृतीक ग्रंथांमध्ये देखील आढळून येतो.
