AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rental Property: भाड्याच्या घराला पेंट करायचंय, पण पैसे कोण मोजणार, घरमालक की भाडेकरु? जाणून घ्या महत्वाचे नियम

Rental Property: भाड्याच्या घराला पेंट करण्याचे काय आहेत महत्त्वाचे नियम? तर घराला पेंट करायचं असेल, तर कोणीच्या खिशातून पैसे जातील? घरमालकाच्या की भाडेकरुच्या? जाणून घ्या नेमके काय आहेत नियम?

Rental Property: भाड्याच्या घराला पेंट करायचंय, पण पैसे कोण मोजणार, घरमालक की भाडेकरु? जाणून घ्या महत्वाचे नियम
| Updated on: Sep 28, 2026 | 1:52 PM
Share

Rental Property: स्वतःचं घर असलं की, आपल्या आवडीने सजवता येतं आणि स्वतःचं घर आहे… अशी सुरक्षितता देखील असते. पण घर जर भाड्याचं असेल आणि त्या घराला पेंट करायचं असेल तर, काय नियम आहेत. याबद्दल फार कोणाला माहिती नसतं.. आता लवकरच दसरा – दिवळी येणार आहे. त्याआधी घराची स्वच्छचा झाली पाहिजे… असं अनेकांना वाटतं. पण घर भाड्याचं असेल तर, पेंट करण्यासाठी कोण पैसे देईल? हा प्रश्न उपस्थित होतो. भाडेकरूच दरवर्षी घराच्या पेंटसाठी पैसे देईल की, घर मालकाची देखील काही जबाबदारी आहे. याबद्दल सांगायचं झालं तर, घराची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी घरमालक आणि भाडेकरु यांच्यावर वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. पण सर्वात आधी एक गोष्ट पाहणं फार गरजेचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे रेंट एग्रीमेंटवर याबद्दल काही लिहिलं आहे की नाही.

जर रेंट एग्रीमेंटद्वारे घराला पेंट आणि सफेदी करण्याची जबाबदारी भाडेकरूवर सोपवण्यात आली नसेल, तर घराच्या पेंटचा आणि सफेदीचा खर्च सामान्यतः घरमालकाची जबाबदारी मानला जातो. ‘उत्तर प्रदेश शहरी परिसर भाडेकरू नियमन कायदा, 2021 च्या दुसऱ्या अनुसूचीमध्येही भिंतींना पेंट करणं तसेच दरवाजे आणि खिडक्यांना रंगकाम करणं या गोष्टी घरमालकाच्या जबाबदारीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

दसरा – दिवाळीत पेंट करायचं असेल तर, कोण भरणार पैसै?

असं समजा की, एखादं कुटुंब अनेक वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत आहे. कालांतराने भिंतींवरील रंग फिका पडला आणि सणासुदीच्या काळात घर नवीन दिसावं यासाठी त्याला पुन्हा रंगकाम करण्याची गरज भासत आहे. जर ही झीज सामान्य वापरामुळे झाली असेल आणि भाडेकरूने भिंतींचं कोणतंही मोठं नुकसान केलं नसेल, तर पेंटचा खर्च सामान्यतः घरमालकाची जबाबदारी असतो.

कायद्यानुसार, दरवाजे आणि खिडक्यांना पेंट करण्यासारख्या कामांची जबाबदारी घरमालकाची असते, तर किरकोळ आणि दैनंदिन स्वरूपाच्या दुरुस्तीची जबाबदारी भाडेकरूची असू शकते. याबद्दल, मालमत्ता भाड्याने देताना केलेला भाडेकरार अत्यंत महत्त्वाचा असतो; कारण दुरुस्ती आणि देखभालीशी संबंधित जबाबदाऱ्या कशा असतील, हे खुद्द करारातच वेगळ्या प्रकारे निश्चित करण्याची मुभा कायद्याने दिली आहे. जर करारावर स्पष्ट लिहिलं असेल की, भाडे करार संपल्यानंतर घराला पेंट करावं लागेल, तर प्रकरण करारवर नमून असलेल्या गोष्टींनुसार होईल.

Follow Us
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?