
आजच्या काळात विमान प्रवास हा सर्वात वेगवान तसेच आरामदायी प्रवास मानला जातो. विमान प्रवास आरामदायी लक्झरी सेवा आणि सुविधा असणारा तर आहेच शिवाय सर्वात खर्चिक देखील आहे. साल २०२५ मध्ये काही विमान कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू इतकी जास्त आहे की त्या श्रीमंत ठरल्या असून त्यातून प्रवास करणे हे प्रतिष्ठेचे समजले जात असते.
डेल्टा एअर लाईन्स ही जगातील सर्वात महागडी एअरलाईन आहे. जिची किंमत सुमारे २६.३१ अब्ज डॉलर आहे. हीचे मुख्यालय अमेरिकेतील अटलांटात आहे. ही कंपनी सहा खंडात विमान सेवा देते. प्रवासी या विमान कंपनीला वेळेवर उड्डाने, शानदार सेवा आणि स्मुद ट्रॅव्हल एक्सपिरियन्ससाठी पसंद करतात.
आयरलँडची रयानएअर युरोपातील प्रसिद्ध एअरलाईन आहे. जिच्या सेवा २०० हून अधिक ठिकाणांसाठी सेवा देतात. साल २०२५ मध्ये या कंपनीची किंमत २३.६४ अब्ज डॉलर इतकी आहे. स्वस्तात तिकीट आणि जास्त रुट्स हीची ओळख आहे.
यूनायटेड एअरलाईन्स ही जगातील चौथी सर्वात महागडी एअरलाईन्स आहे. यूनायटेड एअरलाईन्सची मार्केट व्हॅल्यू २१.५२ अब्ज डॉलर इतकी आहे. हेच हेड ऑफिस शिकागो येथे आहे. ही अमेरिका, युरोप आणि आशियातील मोठ्या शहरांना जोडते.
इंडिगो भारताची सर्वात मोठी आणि जगातील दुसरी सर्वात महागडी एअरलाईन बनली आहे. हीची व्हॅल्यू सुमारे २३.७९ अब्ज डॉलर आहे. ही एअरलाईन लो-कॉस्ट मॉडेलवर काम करते. कमी भाड्यात चांगली सेवा देणे हीचे ध्येय्य आहे.त्यामुळे ही वेगाने नफा कमवत आहे.
एअर चायनाचे बाजारमुल्य १५.२८ अब्ज डॉलर आहे. ही आशिया, युरोप आणि नॉर्थ अमेरिकेतील महत्वाच्या शहरांना सेवा देते. आणि चीनची सर्वात मोठी एअरलाईन्स पैकी एक मानली जाते.
Spain – IAG एक मोठी एअरलाईन कंपनी आहे. जिची किंमत १४.०९ अब्ज डॉलर आहे. हिच्या अंतर्गत British Airways, Iberia, Vueling आणि Aer Lingus सारख्या मोठ्या एअरलाईन्स येतात.ही युरोपच्या प्रमुख एव्हीएशन कंपन्यात मोजली जाते.
साऊथवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी लो-कॉस्ट एअरलाईन आहे. हीची व्हॅल्यू १४.६६ अब्ज डॉलर आहे. हीचा बेस डलास येथे आहे. ही स्वस्त आणि विश्वासार्ह सेवांसाठी प्रसिद्ध आहे.