AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परदेशी लोकांनी शोधलेले ‘हे’ आहे भारतातील पहिले हिल स्टेशन, चला तर मग जाणून घेऊयात

आपल्या भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत, जेथे वर्षभर पर्यटक येत राहतात. तुम्हाला बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल किंवा मे-जूनच्या कडक उन्हापासून आराम मिळवायचा असेल. तर आपण प्रत्येकजण हिल स्टेशनकडे जातो. कारण तेथील वातावरण, निसर्ग पाहून आपल्याला फ्रेश वाटते. आपल्यापैकी अनेकजण भारताच्या वेगवेगळ्या हिल स्टेशनला गेले आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील पहिले हिल स्टेशन कोणते आहे आणि ते कोणी आणि का शोधले? तर आजच्या या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात...

परदेशी लोकांनी शोधलेले 'हे' आहे भारतातील पहिले हिल स्टेशन, चला तर मग जाणून घेऊयात
hill station
| Edited By: | Updated on: May 24, 2025 | 10:39 PM
Share

आपला भारत देश हा विविधतेने परिपूर्ण आहे, कारण येथील हवामान, भौगोलिक रचना आणि नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. तुम्हाला भारतात अनेक सुंदर ठिकाणे मिळतील जिथे अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण अशातच अनेक लोकांना सर्वात जास्त आवडते ते म्हणजे हिल स्टेशन्स. हे हिल स्टेशन वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असते. तुम्हाला हिवाळ्यात बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल किंवा उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी हिल स्टेशनला जातात. आजकाल पर्यटकांसाठी हिल स्टेशन्स ही पहिली पसंती बनत आहेत.

आज भारतात अशी अनेक हिल स्टेशन्स आहेत जिथे लोक उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आणि निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी जातात. बरेच लोकं हिल स्टेशनला खूप भेट देतात. पण तुम्हाला माहित नाही का की भारतातील पहिले हिल स्टेशन कोणते आहे? जर तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील पहिले हिल स्टेशन कोणते आहे आणि ते ब्रिटिशांनी का आणि कसे शोधले हे सांगणार आहोत.

हे भारतातील पहिले हिल स्टेशन आहे.

आपल्या भारतातील मसुरी जे उत्तराखंड मध्ये असलेले पहिले हिल स्टेशन आहे. ज्याला ‘क्वीन ऑफ हिल्स’असेही म्हणतात. हे तेच ठिकाण आहे जे 19 व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी शोधले होते आणि त्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आरामदायी क्षणांसाठी एक परिपूर्ण ठिकाण वाटले.

मसुरीचा शोध कसा लागला?

मसुरीच्या शोधाचे श्रेय ब्रिटिश लष्करी अधिकारी कॅप्टन यंग यांना दिले जाते. त्यांनी वर्ष 1820 मध्ये जेव्हा कॅप्टन यंग आणि एफ.जे. शोर हे मसुरी येथे जाऊन या परिसराच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाले होते. त्यानी इथे एक छोटी झोपडी बांधली आणि उन्हाळ्यात सुर्याच्या हानीकारक किरणांपासून वाचण्यासाठी याठिकाणी येऊ लागले. हळूहळू इतर ब्रिटिश अधिकारी आणि व्यापारीही येथे येऊ लागले आणि मसुरी हे एक लोकप्रिय हिल स्टेशन बनले. ब्रिटीश राजवटीत, हे ठिकाण ब्रिटीशांसाठी ‘समर रिट्रीट’बनले. 1823 मध्ये ते अधिकृतपणे त्याचे हिल स्टेशन म्हणून घोषित करण्यात आले.

मसुरीचे ऐतिहासिक महत्त्व

ब्रिटीश काळात मसुरीमध्ये अनेक शाळा, चर्च, क्लब आणि ग्रंथालये स्थापन करण्यात आली होती, जी अजूनही त्यांचा ऐतिहासिक वारसा जपतात. मसुरीतील प्रसिद्ध लाल टिब्बा, कॅमल्स बॅक रोड, गन हिल आणि मसुरी ग्रंथालय आजही त्या काळातील आठवणी ताज्या करतात. येथे वेल्हम गर्ल्स स्कूल, वुडस्टॉक स्कूल आणि ओक ग्रोव्ह स्कूल अशा अनेक प्रतिष्ठित शाळा आहेत ज्या ब्रिटिश काळापासून चालू आहेत.

मसुरी आजही तितकीच खास आहे

आजही मसुरी हे उत्तर भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. काही जण पर्वतांच्या थंडीचा आनंद घेण्यासाठी जातात, काही ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर करण्यासाठी जातात, तर काही जण फक्त शांतता आणि विश्रांतीचे क्षण अनुभवतात. येथील मॉल रोड, केम्प्टी फॉल्स, गन हिल आणि जॉर्ज एव्हरेस्ट हाऊस पाहण्यासारखे आहेत.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.