रेल्वे रुळांमध्ये बारीक खडी का टाकली जाते? तुम्हालाही माहिती नसेल कारण

तुम्ही ट्रेनने प्रवास केला असेलच. रेल्वे रुळांच्या मध्ये आणि त्याच्या बाजूला अनेक छोटे दगडं टाकलेलं असतात, तुम्ही कधी विचार केला आहे का? या दगडांचा नेमका उपयोग काय असू शकतो?

रेल्वे रुळांमध्ये बारीक खडी का टाकली जाते? तुम्हालाही माहिती नसेल कारण
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 8:58 PM

आज कोटयावधी लोकं दररोज रेल्वेनं प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सुद्धा रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. अशातच लोकल तर ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. तुम्ही सुद्धा रेल्वेने प्रवास केला असेल. तुम्ही कधी रेल्वे रुळांकडे बारकाईने पाहिले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की रुळांच्या मध्ये आणि खाली छोटे दगड म्हणजे बारीक खडी असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे बारीक दगड रुळांच्या मध्ये का ठेवले जातात? तर या बारीक दगडांचे काम काय आहे आणि जर हे दगड रेल्वे ट्रॅकवरून काढून टाकले तर काय होईल? तर हे सर्व प्रश्न तुम्हाला केव्हा न केव्हा पडले असतीलच, यासाठी आजच्या या लेखात आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

रुळांमध्ये दगड का आहेत?

रेल्वे रूळांमध्ये बारीक दगड वापरण्याचे एक विशेष असं कारण आहे. कारण रेल्वेची एकुण रचना लक्षात घेऊन रूळांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर रूळांवर वापरलेल्या या दगडांना “बॅलास्ट” म्हणतात, आणि ते रेल्वे ट्रॅकच्या स्थिरतेसाठी, सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहेत. या बॅलास्टच्या खाली मातीचे दोन थर असतात आणि सर्वांत खाली जमीन असते. जेव्हा या ट्रॅकवरून रेल्वे धावते तेव्हा कंपनं निर्माण होतात. त्यामुळे रूळ विलग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनं कमी करण्यासाठी तसेच रूळ वेगळे होऊ नयेत यासाठी दोन रुळांदरम्यान खडी किंवा लहान अथवा मध्यम आकाराचे दगड टाकले जातात.

ट्रॅकला स्थिरता देण्यासाठी

बॅलास्ट हे रुळांना घट्ट धरून ठेवतात. हे दगड एकमेकांशी जोडले जातात आणि एक मजबूत आधार तयार करतात, ज्यामुळे रुळ हलू शकत नाहीत. जर हे दगड नसतील तर रुळ वेगळे झाले असते किंवा वाकडे होऊ शकतात, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो.

ट्रेनचे वजन समतोल राखणे

ट्रेनचे वजन अधिक असते. जेव्हा ट्रेन थेट रुळांवरून धावते तेव्हा बॅलास्टचे दगड ट्रेनच हे वजन जमिनीपर्यंत पोहचवते. यामुळे रुळांवर असमान दाब पडू शकत नाही, त्यामुळे रूळ जास्त काळ टिकतात. बॅलास्ट म्हणजेच हे बारीक दगड नसेल रुळ हे ट्रेनच्या वजनाने जमिनीत जाऊ शकतात किंवा तुटू शकतात.

ड्रेनेज सुविधा

पावसाळ्याच्या दिवसात, रुळांभोवती पाणी साचू शकते, ज्यामुळे रुळ गंजू शकतात किंवा कमकुवत होऊ शकतात. पण रूळांवर असलेले दगडामुळे पाणी सहजपणे बाहेर पडते आणि रुळ कोरडे राहतात. याशिवाय रुळांदरम्यान टाकलेली खडी पाण्यात वाहूनही जात नाही.

कंपन आणि आवाज कमी करणे

जेव्हा एखादी ट्रेन चालते तेव्हा रुळांवर कंपन होते, ज्यामुळे आवाज होऊ शकतो. त्यामुळे रूळ विलग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनं कमी करण्यासाठी तसेच रूळ वेगळे होऊ नयेत यासाठी दोन रुळांदरम्यान खडी किंवा लहान अथवा मध्यम आकाराचे दगड टाकले जातात. जर हे दगड नसतील तर ट्रेन चालताना जास्त आवाज करेल आणि आजूबाजूच्या भागात ध्वनी प्रदूषण वाढेल.

तापमान बदलांपासून संरक्षण

उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात धातूचे ट्रॅक विस्तारतात आणि आकुंचन पावतात. बॅलास्ट स्टोन ट्रॅकला लवचिकता देतात आणि तापमानातील बदलांमुळे होणाऱ्या विस्तार किंवा आकुंचनाला संतुलित करतात. यामुळे ट्रॅक तुटण्यापासून रोखले जाते आणि ते दीर्घकाळ सुरक्षित राहतात.

रोपांना वाढण्यापासून रोखणे

रुळांमध्ये बारीक दगडाच्या आत मातीचा थर असतो. त्यामुळे रूळांवर झाडं-झुडपं वाढू शकतात, ज्यामुळे रुळ कमकुवत होऊ शकतात. बॅलास्ट स्टोन वनस्पतींची वाढ होत नाही. त्यामुळे रोपांना वाढण्यापासून रोखले जाते.