AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate Today 6 February 2026 : अखेर फुगा फुटलाच, चांदी 1.91 लाखाने स्वस्त, तर सोनं…? वाचा आणि थेट दुकानच गाठा, नाही तर…

Gold-Silver Rate Today 6 February 2026 Latest News Updates in Marathi : सोनं आणि चांदी... याचं ऑबसेशन कमी होत नाही आपल्याकडे. कधी वर कधी खाली जाणाऱ्या या मौल्यवान धातूंच्या किमती काही दिवसांपासून कमी होत आहेत. डॉलरच्या सततच्या वाढीमुळे सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी उच्चांकावरून लक्षणीयरीत्या घसरल्या आहेत. चांदी 1 लाख 90 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाली आहे आणि आजही त्यात घसरण दिसून येत आहे. आजचे सोन्या-चांदीचे दर किती ? जाणून घ्यायचं असेल तर हे वाचाच..

Gold-Silver Rate Today 6 February 2026 :  अखेर फुगा फुटलाच, चांदी 1.91 लाखाने स्वस्त, तर सोनं...? वाचा आणि थेट दुकानच गाठा, नाही तर...
सोन-चांदीचे दर वाढले की घसरले ?Image Credit source: TV9
| Updated on: Feb 06, 2026 | 1:35 PM
Share

Gold Silver Rate : सामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा, लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे दागिन, चांदीची भांडी किंवा अजून काही वस्तू करता यावी असं प्रत्येकाचचं स्वप्न असतं. पण गेल्या काही काळात या दोन्ही धातूंनी जी उत्तुंग झेप घेतली होती, त्याने सामान्य माणसाच्या डोळ्यातलं (खरेदीचं) स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय अशी शंका येत होती. पण सोन्याचे-चांदीचे दर जसे वर चढतात तसे खालीही येतात, गेले काही दिवस हाच ट्रेंड सुरू होता आणि आज शुक्रवार ( 6 फेब्रुवारीलाही ) तोच कायम दिसत आहे. आजच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात सलग मोठी घसरण दिसत आहे.

MCX ( मल्‍टी कमोडिटी मार्के) मध्ये सोने आणि चांदीच्या किमती सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. सकाळी 11:30 वाजता चांदी 5000 रुपयांनी घसरून 2.38 वर आली, तर सोने 1 हजार रुपयांनी घसरून1.50 लाख रुपयांपेक्षा थोडं जास्त होतं. पण सुरूवातीच्या काळात चांदीची किंमत 15000 हजारांनी तर सोनं 1800 रुपयांनी खाली घसरलं होतं. त्यामुळे सोने आणि चांदीच्या विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत, आता सोनं आणि चांदीचे भाव लक्षणीयरीत्या स्वस्त झाले आहेत. पण हे दोन्ही धातूंचे भाव पुन्हा त्या पातळीवर येतील का असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. सोने आणि चांदीच्या किमतीत झालेल्या या घसरणीमागील कारणं जाणून घेऊया.

रेकॉर्ड हायपेक्षा चांदी 1.91 लाखांनी स्वस्त

29 जानेवारी रोजी चांदीचा भाव 4.20 लाख (प्रति किलो) रुपये होता. तो चांदची सर्वात हाय रेकॉर्ड ठरला. मात्र आज चांदीचे भाव हे 2.29 लाख रुपयांवर आले आहेत. म्हणजेत आत्तापर्यंत चांदीच्या किंमतीत एकूण 1.91 लाखापर्यंत धसरण झाली आहे. त्याशिवाय सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण झाल्याचं दिसतंय. गेल्या महिन्यात म्हणजे 29 जानेवारी रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 1.93 लाख रुपये होती, परंतु आज म्हणजे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात ती किंमत 1.49 लाख रुपयांपर्यंत घसरली. याचा अर्थ सोन्याचे दर 44 हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात एवढी घसरण कशी ?

अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने आज सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, सेबी-नोंदणीकृत बाजार तज्ज्ञ अनुज गुप्ता यांच्या मते, दोन्ही देशांनी संभाव्य अणु कराराबाबत चर्चा सुरू करण्याची घोषणा केली आहे आणि पहिली चर्चा आज (शुक्रवार) होत आहे. या बातमीनंतर, गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित आश्रयस्थानांपासून त्यांचे लक्ष अमेरिकन डॉलरकडे वळवले. मजबूत डॉलरमुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येतो. त्याच वेळी, PACE 360 चे चीफ ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट अमित गोयल म्हणतात की सोने आणि चांदीसह धातूंच्या किमतीत वाढ आता शिगेला पोहोचली आहे. त्यांनी सल्ला दिला की जास्त किमतीत खरेदी केलेल्या पोझिशन्स धारण करणारे गुंतवणूकदार अलिकडच्या सौम्य तेजीत (डेड-कॅट बाउन्स) बाहेर पडू शकतात.त्यांच्या मते, भविष्यात मौल्यवान धातूंच्या किमती आणखी घसरू शकतात आणि हळूहळू त्यांच्या योग्य किंवा वाजवी पातळीकडे (वाजवी मूल्य) जातील, जे सध्याच्या किमतींपेक्षा खूपच कमी मानले जाते.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ