दारु पिण्याआधी चिअर्स का बोलले जाते, कशी सुरु झाली ही प्रथा ?

Cheers Before Drinking Alcohol History: दारुचे ग्लास हातात घेऊन एकमेकांना चिअर्स म्हणून गटवण्याची रित प्रसिद्ध आहे. परंतू हे चिअर्स बोलण्याचा नेमका इतिहास मोठा रंजक आहे.

दारु पिण्याआधी चिअर्स का बोलले जाते, कशी सुरु झाली ही प्रथा ?
Cheers Before Drinking Alcohol History
| Updated on: Feb 09, 2026 | 11:22 PM

जसे फोनवर बोलताना आधी हॅलो म्हटले जाते, तसेच मद्य पिताना नेहमीच ग्लासांवर ग्लास धडकवून चियर्स म्हटले जाते. परंतू ग्लास अशा प्रकारे टकरवत चिअर्स का म्हटले जाते, हा शब्द प्रयोग केला जातो ? दारुच्या मैफीलीत चिअर्स शब्दाची अखेर एण्ट्री तरी कशी झाली ? चिअर्स हा शब्द फ्रेंच भाषेतील जुना शब्द ‘chiere’ वरुन आलेला आहे. त्याचा अर्थ चेहरा किंवा डोके. १८ व्या शतकात या शब्दाचे चलन आनंद जाहीर करण्यासाठी किंवा कोणाला प्रेरित करण्यासाठी होत होता.

हळूहळू हा शब्द मद्याशी जोडला गेला आणि आज चिअर्स दारु एन्जॉय करण्याच्या आधी आपसुकपणे तोंडातून निघतो. याची सुरुवात अनेक कारणांनी झाली असावी. चला तर पाहूयात मद्य पिण्याच्या आधी चिअर्स बोलण्याची सुरुवात कशी झाली.

दारु चिअर्स शब्दाचे कनेक्शन?

या शब्दाच्या चलनामागे अनेक थिअरी आहेत. एका थिअरीनुसार जुन्या काळात लोक विषापासून वाचण्यासाठी आपआपसात ग्लास धडकावायचेत आणि मोठ्याने चिअर्स बोलायचे. त्याकाळात मद्यात विष मिसळून हत्या करण्याची प्रथा होती. त्यामुळे असे मानले जात असे की ग्लास भरुन परस्परांना धडकवले तर एका ग्लासातील दारुचे थेंब दुसऱ्या ग्लासात जायचे. यामुळे जर ग्लासात विष असेल तर मृत्यूचा धोका थोडा कमी व्हायचा.

वाईट आत्म्यांचा संबंध

मध्ययुगात वाईट आत्मा वा राक्षसांना पळवण्यासाठी ग्लासांची परस्परांना टक्कर करायचे आणि जोराने चिअर्स म्हणायचे. लोक ग्लासांची टक्कर करताना थोडे मद्य लादीवर सांडायचे, हे पेय वाईट आत्म्यांशी सोडले जायचे, म्हणजे मद्य पिणाऱ्याला वाईट आत्मा शिकार बनवू नये.

चिअर्स म्हणण्याची प्रक्रियेला इश्वराशी देखील जोडलेले आहे. इंटरनॅशनल हँडबुक ऑफ अल्कोहोल एण्ड कल्चरच्या नुसार संभवत: या प्रक्रीयेची सुरुवात देवांच्या समोर दिल्या जाणाऱ्या बळीपासून झाली असावी. जेव्हा बळी देण्याच्या आधी समोर रक्त किंवा दारुला अर्पित केले जायचे. या दारु वा रक्ताच्या बदल्यात लोक आपली मनोकामना ईश्वरांसमोर ठेवली जात होती. या प्रकारे ईश्वरासमोर दारु किंवा रक्त ठेवून चिअर्स करण्याच्या परंपरेला बळ मिळाले.