लिव्हर की किडनी ?, दारु कोणत्या अवयवास जास्त खराब करते ?
"दारु पिणे से लिव्हर खराब होता है" असे आपण नेहमीच ऐकले असेल परंतू मद्याचा परिणाम शरीराच्या अनेक अवयवास होतो. दारु सर्वाधिक कोणत्या अवयवास डॅमेज करते हे देखील महत्वाचे आहे.

liver and kidney
- दारुच्या सेवन हे सर्वात धोकादायक व्यसन मानले जाते. शरीराच्या प्रत्येक अवयवावर दारुचा वाईट परिणाम होत असतो. परंतू जर तुलना करायची झाली तर लिव्हर (Liver) दारुच्या सेवनाने खराब होतो असा सर्व साधारण समज असतो. याशिवाय दारु आपल्या किडनीला देखील डॅमेज करते. यामुळे लोकांच्या मनात एक प्रश्न नेहमीच येतो. दारु शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वात जास्त प्रभावित करते? ते पाहूयात. तज्ज्ञ डॉक्टरांनी दारु शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वाधिक धोका पोहचवते ते सांगितले आहे.
- जर कोणी व्यक्ती मद्याचा जास्त आहारी गेला असेल तर दारुमुळे त्याचा लिव्हर आणि किडनी हळूहळू खराब होऊ लागते. परंतू त्या व्यक्तीने दारु पिणे बंद केले तर लिव्हर आणि किडनीला जे नुकसान पोहचले होते ते हळूहळू कमी होते.दारु अचानक बंद केल्याने काही शारीरिक समस्या आणि मानसिक समस्येची लक्षणे पाहायला जरुर मिळतात. त्यास डॉक्टरांच्या मदतीने औषधे आणि काऊन्सिलिंगच्या द्वारे नीट करता येते.
- दारु जास्त प्यायल्याने सर्वात जास्त धोका लिव्हरला धोका असतो. लिव्हर दारुला विषारी पदार्थापासून बदलवून शरीराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेत लिव्हरच्या काही पेशी डॅमेज होतात. मद्याने लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ शकते. दीर्घकाळ मद्य प्यायल्याने लिव्हरमध्ये स्थायी जखमा होतात. त्यास (Scarring) म्हटले जाते. ज्यास लिव्हर सिरॉसिस म्हणतात.
- दारुमुळे लिव्हरमध्ये सूज येते आणि शरीराचा हा महत्वचा अपयश काम करणे बंद करतो. दारुचा गुणधर्म एक ‘मूत्रवर्धक’ (Diuretic)आहे.ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि किडनीवर दबाव वाढतो. दारुमुळे ब्लड प्रेशर देखील प्रचंड वाढते. किडनी खराब होण्यास सर्वात मोठे कारण म्हणजे ब्लडप्रेशरचे जास्त प्रमाण, अनेकदा दारुमुळे लिव्हर खराब होतो आणि तो किडनी देखील खराब करतो.यास ‘हेपेटोरेनल सिंड्रोम’म्हणतात.
- दारु सर्वात आधी लिव्हरला निशाणा बनवते, परंतू किडनीला देखील तिचा धोका असतो. हे दोन्ही अवयव एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे दारुमुळे लिव्हर खराब होतो, तो लवकरच किडनीला देखील खराब करतो.





