अंतराळात शारीरिक संबंध ठेवण्यास NASA का करते मनाई? चुकून प्रेग्नंट झाल्यास काय होईल? कुणालाच माहीत नसेल कारण
NASA Strictly Prohibits Getting Pregnant In Space : अंतराळात गेल्यावर तिथे शरीरसंबंध ठेवणं हे तुमच्या कल्पनेला आकर्षक वाटू शकतं, पण नासाने त्यावर कडक बंदी घातली आहे. त्यामागचं नेमकं कारण काय?, चला जाणून घेऊया.

पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर, अंतराळात जाणं हे लोकांना खूप मनोरंजक वाटतं, पण ते एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. तिथे बराच काळ राहणे आणि नवीन प्रयोग करणे हे एक मोठे चैलेंज असतं. अंतराळवीरांमध्ये पुरुष आणि महिला दोघेही असतात. मात्र अंतारळात जाणाऱ्या महिला अंतराळवीरांबद्दल नासा चिंतित असतं कारण कोणतीही महिला अंतराळात गर्भवती राहू नये. कारण अंतराळात असे कृत्य बेजबाबदार मानले जाते आणि नासा देखील अंतराळात शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई करते. पण अंतराळात असं घडलं ( शरीरसंबंध ठेवले) तर काय होईल असा प्रश्नही अनेकांना पडत असतो. चला आज त्याबद्दल जाणून घेऊया.
अंतराळात गरोदर राहिल्यास काय होतं ?
नासाच्या सांगण्यानुसार,कीटक आणि त्यांच्या संततीवर केलेले प्रयोग यशस्वी झाले आहेत, परंतु मोठ्या प्राण्यांवर अद्याप असे प्रयोग झालेले नाहीत. पण स्पेस थेरपी स्पेशलिस्ट यांच्या सांगण्यानुसार, भौतिक आणि जैविक दृष्टिकोनातून अंतराळात गर्भधारणा पूर्णपणे शक्य आहे. अंतराळात गुरुत्वाकर्षणाची कमतरता आणि रेडिएशनमुळे, गर्भाचे नुकसान होण्याची आणि मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. खरं तर, अवकाश किंवा अंतराळ हे आपल्या मानवी शरीरावर कसा परिणाम करतो याबद्दल आपल्याला अजूनही फारशी माहिती नाही. परंतु आकडेवारी नुसार, सर्वसाधारणपणे ही जागा मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे, असे समोर आले आहे.
बराच काळ अंतराळात राहिल्यास काय होतो परिणाम ?
गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेचा अंतराळवीरांवर, विशेषतः दीर्घकाळाच्या मोहिमांसाठी राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम होतो. लोकांच्या स्नायूंचे टिश्यू संपू लागतात आणि त्यांच्या हाडांची ताकद कमी होते. गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे रक्तदाबावर नकारात्मक परिणाम होतो, परंतु त्याचा एक सकारात्मक पैलू देखील आहे, जो अंतराळात शारीरिक संबंधांमध्ये मदत करू शकतो.
अंतराळात शारीरिक संबंध ठेवणं कठीण
नासाचे इंजीनिअर जोनाथन मिलर, यांनी 30 वर्षांहून अधिक काळ एजन्सीसोबत काम केले आहे, त्यांनी गुरुत्वाकर्षण नसलेल्या जागेत संबंध प्रस्थापित करण्याच्या अडचणी स्पष्ट केल्या. त्यांच्या सांगण्यानुसार, “अंतराळात शरीरसंबंध ठेवणं खूप कठीण आहे. कारण वास्तवात असं करणं अशक्य आहे आणि एकटं राहणं कठिण आहे, म्हणून अंतराळात शरीर संबंध ठेवण्याला अधिक महत्त्व दिलं जातं. अंतराळात सेक्स पोझिशन्सची संख्या जवळजवळ तिप्पट होते आणि जोडप्यांना सतत त्यांचे पाय स्थिर ठेवावे लागतात.”
