
लग्न.. आयुष्यातला हा एक असा टप्पा, असा प्रसंग ज्याबद्दल प्रत्येक व्यक्ती व्यक्ती,मुलगा असो की मुलगी ते स्वप्न रंगवतात. त्यामुळे आयुष्यात खूप मोठा बदल होतो. आपल्याकडे लग्न हे एक जन्माचं नव्हे तर सात जन्मांचं बंधन मानलं जातं. हे नातं दोन लोकांना एकत्र आणतं, त्यांना आयुष्यभरासाठी एकत्र नात्यात बांधतं. सुख, दु:ख, प्रगति, आनंद, वाईट काळ, सगळ्यात पती-पत्नीच एकमेकांना खंबीरपणे साथ देतात. लग्न ठरलं की ते लागून घरी जाईपर्यंत अनेक विधी, परंपरा असतात. मात्र त्यातील काही रिती अशा असतात ज्याबद्दल आपण जाणतो, पण त्याचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहीत असतो.
लग्नानंतर असाच एक विधी म्हणजे सुहागरात… सुहागरात म्हणजे काय याची बऱ्याच लोकांना कल्पना असेल , त्याचा अर्थही काहींना ज्ञात असेल, पण त्याचा खरा अर्थ, आणि त्यामागचं कारण हे फारच कमी लोकांना माहीत असेल. या लेखात आपण सुहागरातचा खरा अर्थ आणि त्याचं लॉजिक जाणून घेऊया..
सुहागरात म्हणजे काय, काय आहे खरा अर्थ ?
आपल्यापैकी अनेकांनी ‘सुहागरात’ हा शब्द ऐकला आहे आणि अनेकांना त्याचा अर्थ माहित असेल, परंतु बऱ्याच लोकांना त्याचा खरा अर्थ माहित नसेल. ही विशेष रात्र मानली जाते कारण ती वधू-वरांची पहिली रात्र असते. मुलगा असो की मुलगी, दोघांनाही, आपल्या जोडीदाराला समजून घेण्याची इच्छा असते. आणि सुहागरात यावेळी त्यांना एकमेकांना जवळून समजून घेण्याची आणि त्यांचे कौटुंबिक जीवन सुरू करण्याची संधी या रात्री मिळते, तिथपासून त्यांची, त्यांच्या नात्याची नवी सुरूवात होते. पण याला सुहागरात असंच का म्हणतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?
लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीला सुहागरातच का म्हणतात ?
खरंतर सुहागरात या शब्दाचा अर्थ संस्कृत शब्दापासून आला आहे. तो सौभाग्य या शब्दाशी संबंधित आहे जो सुहागचा उगम मानला जातो. सुहाग आणि सुहागन हे दोन्ही शब्द विवाहित महिलेसाठी किंवा तिच्या संदर्भात वापरले जातात. लग्नानंतर महिलांना सुहागन म्हणजेच सौभाग्यवती असं म्हटलं जातं आणि मंगळसूत्र, बांगड्या, चुडा, सिंदूर, पैंजण, जोडवी असे सौभाग्याशी निगडीत अनेक दागिने त्या महिला घालतात. पतीचे आयुष्य वाढवण्यासाठी त्या हे दागिने परिधान करतात असं म्हटल जातं. त्यामुळेच, सुहागन, म्हणजेच सौभाग्यवती स्त्रीच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीला सुहागरात म्हणतात.