सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर WC लिहिण्याचा अर्थ काय? 99% लोकांना माहितच नाही

सार्वजनिक Toilet किंवा Bathroom बाहेर WC असं लिहिलेलं असतं. तर आपल्यापैकी अनेकांना याचा संपूर्ण अर्थ माहितही नसेल. तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला आहे WC म्हणजे नेमकं का लिहिलं आहे? चला जाणून घेऊयात.

सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर WC लिहिण्याचा अर्थ काय? 99% लोकांना माहितच नाही
| Edited By: | Updated on: Feb 11, 2025 | 4:55 PM

आपल्या आसपास अनेक प्रकारच्या शॉर्टफॉर्म गोष्टींचे साइन बोर्ड सगळीकडेच पाहायला मिळतात. जे नजरेला तर पडतात पण त्यांचे अर्थ आपल्याला माहित नसतात. असंच एक आहे ते म्हणजे पब्लिक टॉयलेटच्या बाहेर WC लिहीलेलं असतं पण याचा अर्थ काय? तुम्हाला माहीत नसल्यास, तुम्ही नेहमी अडचणीत येऊ शकता.

प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे किंवा शॉपिंग मॉल असो तसेच सिनेमा हॉल, आपण कुठे बाहेर गेलो की सार्वजनिक शौचालयांमध्ये जातो. तिथं महिला आणि पुरुषांचे टॉयलेट दर्शवणारे साइन बोर्ड असतात. पण तुम्ही आणखी एक गोष्ट पाहिली आहे का? या सार्वजनिक टॉयलेटबाहेर WC असंही लिहिलेलं असतं. याचा अर्थ काय? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? सामान्यपणे आपण शौचालयासाठी बाथरूम किंवा टॉयलेट असा शब्द वापरतो. या दोन्ही शब्दांमध्ये WC नाही. मग असं का लिहिलेलं असतं?

सार्वजनिक शौचालयात WC या शब्दाचा अर्थ काय आहे अनेकांना माहित नसतो, त्यामूळे अनेकजण संभ्रमात पडतात. आज आपण WC चे संपूर्ण अर्थ जाणून घेणार आहोत. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बाहेर असे का लिहिले जाते हेही आम्ही सांगू?

तर काही ठिकाणी शौचालयाच्या बाहेर WC हा शब्दही लिहिला असतो. कदाचित अनेकांना या WC शब्दाचा अर्थ काय आहे हे माहीत नसेल. खरं तर, टॉयलेट किंवा बाथरूमचे दुसरे नाव WC आहे. WC शब्दाचा पूर्ण अर्थ म्हणजे वॉटर क्लोसेट. बाथरूममध्ये वॉशिंग बेसिन ठेवतात त्यामुळेच बाथरूमला वॉटर क्लोसेटही असे ही म्हणतात. याचा वापर नंतर बाथरूमऐवजी टॉयलेटसाठीदेखील होऊ लागला. अशा सार्वजनिक शौचालयांबाहेर WC लिहिलेलं असतं. मग शौचालयाच्या बाहेर WC (वॉटर क्लोसेट) लिहिलेले नसेल तर समजून घ्या की तिथे पाण्याची सोय कमी असण्याची शक्यता असते. जिथे पाण्याचा तुटवडा असतो, अथवा पाण्यासाठी अधिक खर्च करण्याची त्या त्या संस्थांची तयारी नसते. तिथे असे प्रकार दिसतात. याठिकाणी पाण्याचा पूर्नवापरावर पण भर देण्यात येतो.