AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या खोलीत आवाज असतो शून्यापेक्षा कमी, शांततेचा ट्रॅप का ठरतो धोकादायक? जाणून घ्या!

Worlds Silent Room : जगात अशी एक खोली आहे, जिथे तुम्हाला पिन-ड्रॉप शांतता जाणवेल. या खोलीला अ‍ॅनेकोइक चेंबर असे नाव आहे. ही खोली मायक्रोसॉफ्टच्या अमेरिकेतील मुख्यालयात आहे.

या खोलीत आवाज असतो शून्यापेक्षा कमी, शांततेचा ट्रॅप का ठरतो धोकादायक? जाणून घ्या!
Silent RoomImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 10, 2025 | 9:29 PM
Share

जगातील प्रत्येक व्यक्तीला शांतता हवी असते, शांततेच्या शोधात अनेकजण धावपळीच्या जगापासून दूर जात असतात. कुणी जंगलात जाते, तर कुणी डोंगरावर जाते. यामुळे लोकांना काही प्रमाणात शांतता जाणवते. मात्र जगात अशी एक खोली आहे, जिथे तुम्हाला पिन-ड्रॉप शांतता जाणवेल. या ठिकाणी तुम्हाला शांतता इतकी तीव्र आहे की लोकांना त्यांच्या हृदयाचे ठोके अनेक पटींनी जास्त ऐकू येतात. या खोलीला अ‍ॅनेकोइक चेंबर असे नाव आहे. ही खोली मायक्रोसॉफ्टच्या अमेरिकेतील मुख्यालयात आहे. ही खोली इतकी शांत आहे की येथील आवाजाची पातळी शून्यापेक्षाही खाली जाते. म्हणजे येथील आवज आपल्या कानांना ऐकू येणाऱ्या किमान ध्वनीपेक्षाही कमी आहे. मात्र ही खोली जितकी शांत आहे तितकीच धोकादायक आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

ही रूम का तयार करण्यात आली?

अ‍ॅनेकोइक चेंबरची निर्मिती ही ध्वनीची अचूक चाचणी करण्यासाठी करण्यात आलेली आहे. या रुमच्या भिंती, छत आणि फरशीमध्ये कोणत्याही आवाजाला प्रतिध्वनी देण्याची क्षमता नाही. मायक्रोफोन, स्पीकर्स, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि कीबोर्ड यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आवाजाची चाचणी करण्यासाठी याचा वापर केला जातो.

ही रूम कशी तयार करण्यात आली?

ही रूम तयार करण्यासाठी जाड स्टीलच्या भिंती, जाड काँक्रीट आणि विशेष फायबरग्लास कोटिंग वापरण्यात आली आहे. यामुळे या रूमच्या भिंती ध्वनी शोषून घेतात, म्हणजेच कोणताही आवाज भिंतीवरून आदळून परत येत नाही. हे संपूर्ण चेंबर एका मोठ्या काँक्रीट बॉक्समध्ये. त्यामुळे आतमध्ये बाहेरील कोणतेही कंपन किंवा आवाज आत प्नवेश करत नाही. त्यामुळे इथे भयाण शांततेचा अनुभव येतो.

शांतता ठरते घातक

अ‍ॅनिकोइक चेंबरमध्ये भयाण शांतता असते. मानवी मेंदूला नेहमीच आवाज हवा असतो. जेव्हा आवाज येत नाही तेव्हा मेंदूला शरीराची दिशा समजत नाही. त्यामुळे अनेक लोक आत पडतात. तसेच काही लोक घाबरतात, तसेच अनेकांना चक्कर येते. त्यामुळे बहुतेक लोक या खोलीत काही सेकंद किंवा मिनिटांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाहीत. मेंदू अशा शांततेत राहिल्यास तो अतिक्रियाशील होतो. तो स्वतःचे आवाज निर्माण करू लागतो, ज्यामुळे लोक भ्रमात पडतात किंवा त्यांना खोटे आवाज ऐकू येते. अशा परिस्थितीत दीर्घकाळ राहिल्याने मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लोक आतमध्ये जास्त वेळ राहू शकत नाहीत.

जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण शांततेत राहते तेव्हा मेंदूचे काय होते?

जर एखादी व्यक्ती बराच काळ आवाजाशिवाय राहिली तर त्याचा मेंदू आणि शरीरावर खोलवर परिणाम होतो. विज्ञानानुसार, आपला मेंदू नेहमीच आजूबाजूच्या आवाजांवर प्रक्रिया करत असतो. हे आवाज, जरी खूप कमकुवत असले तरी, मनाला स्थिर ठेवतात. परंतु जेव्हा आवाज पूर्णपणे गायब होतात तेव्हा मेंदूला कोणतेही बाह्य सिग्नल मिळत नाहीत. काही मिनिटांतच, तो स्वतःच्या हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह आणि स्नायूंच्या हालचाली ऐकू लागतो.

अशा शांततेत जास्त वेळ राहिल्याने मेंदू अतिक्रियाशील होतो. बाह्य ध्वनींच्या अनुपस्थितीत, तो स्वतःचे आवाज निर्माण करू लागतो, ज्यामुळे व्यक्ती भ्रमात पडते आणि खोटे आवाज ऐकू येते. या स्थितीला श्रवणभ्रम म्हणतात, कारण आपली संतुलन प्रणाली देखील ध्वनींमधून संकेत घेते. म्हणूनच अशा खोल्यांमध्ये चालताना लोक अडखळतात. अशा परिस्थितीत दीर्घकाळ राहिल्याने मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, म्हणून कोणीही जगातील सर्वात शांत खोल्यांमध्ये जास्त काळ राहू शकत नाही.

'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.