1 फेब्रुवारीपासून 153 रुपयांत 100 चॅनल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : टीव्ही बघणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून टीव्ही बघणाऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या आदेशानुसार, आता दर्शकांना 100 चॅनल्स बघण्यासाठी केवळ 153 रुपये खर्च करावे लागणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीपासून ही नवी सुविधा लागू होणार आहे. त्यामुळे 31 जानेवारीपूर्वी आपल्याला हव्या असणाऱ्या 100 चॅनल्सची निवड करण्यास […]

1 फेब्रुवारीपासून 153 रुपयांत 100 चॅनल
Follow us on

मुंबई : टीव्ही बघणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून टीव्ही बघणाऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या आदेशानुसार, आता दर्शकांना 100 चॅनल्स बघण्यासाठी केवळ 153 रुपये खर्च करावे लागणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीपासून ही नवी सुविधा लागू होणार आहे. त्यामुळे 31 जानेवारीपूर्वी आपल्याला हव्या असणाऱ्या 100 चॅनल्सची निवड करण्यास ट्रायने ग्राहकांना सांगितले आहे. ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून याबाबतची माहिती दिली जात आहे. तुम्ही ट्रायच्या फोन नंबरवर किंवा ईमेल आयडीवरुनही याबाबची माहिती मिळवू शकता.

153 रुपयांत काय-काय मिळणार?

100 चॅनल्सच्या स्लॉटसाठी नेटवर्क कपॅसिटी शुल्क म्हणून 153 रुपये द्यायचे आहेत. यात जर तुम्ही फ्री टू एअर चॅनेल निवडता, तर तुम्हाला कुठलेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. मात्र पेड चॅनल्ससाठी तुम्हाला एक निश्चित शुल्क भरावे लागेल.

100 पेक्षा जास्त चॅनल्स बघायचे असल्यास, पुढील 25 चॅनल्समागे 20 रुपये असे शुल्क भरावे लागेल. ट्रायनुसार, या बेस पॅकमध्ये एचडी चॅनल्स समाविष्ट नसतील. तर काही वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार, यामध्ये तुम्ही एचडी चॅनल्सही निवडू शकता. एक एचडी चॅनेल हे दोन एसडी चॅनल इतके असेल. म्हणजेच तुम्ही दोन बिगर एचडी चॅनलच्या बदल्यात एक एचडी चॅनल निवडू शकता. याबाबतची अधिक माहिती तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला विचारु शकता.

ट्रायच्या या निर्णयानुसार, एका चॅनलचं सबस्क्रीप्शन हे 19 रुपयांपर्यंत असेल. ग्राहक आपल्या इच्छेनुसार चॅनेलची निवड करु शकतात. त्यामुळे त्यांना सर्व्हिस प्रोव्हायडरने नेमून दिलेल्या चॅनल्सचं सबस्क्रीप्शन घ्यायची गरज नाही.

ग्राहक 011-23237922 (एके भारद्वाज) आणि 011-23220209 (अरविंद कुमार) या नंबरवर कॉल करुन किंवा advbcs-2@trai.gov.in आणि arvind@gove.in यावर ईमेल करुन याबाबतची आणखी माहिती मिळवू शकतात.