वर्षभरात मुंबईतल्या गोवंडीतील 21 तरुणी गायब, किरीट सोमय्यांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

| Updated on: Nov 22, 2020 | 4:01 PM

गोवंडी परिसरातून मुली बेपत्ता होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

वर्षभरात मुंबईतल्या गोवंडीतील 21 तरुणी गायब, किरीट सोमय्यांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Follow us on

मुंबई : मुंबईतल्या गोवंडी (Govandi) परिसरातून गेल्या 11 महिन्यात 21 तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे बेपत्ता झालेल्या तरुणी जातात कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या 21 पैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. गोंवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 4 मुली 29 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या मागील 14 दिवसांमध्ये बेपत्ता झाल्या असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहे. तसेच सोमय्या यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणीदेखील केली आहे.

महाराष्ट्रात दररोज 105 मुली बेपत्ता होतात, एनसीआरबीकडून खुलासा

राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभागाने (NCRB) 2019 मधल्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबतची धक्कादायक माहिती महिनाभरापुर्वी मांडली होती. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी 105 महिलांच्या बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये सगळ्यात भयंकर बाब म्हणजे प्रत्येक दिवशी 17 महिलांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय स्तरावर बेपत्ता महिला आणि तस्करीच्या सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सगळ्यात अव्वल आहे. यानंतर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालचा नंबर येतो.

2019 मध्ये तस्करीच्या शिकार झालेल्या 989 घटनांमध्ये 88 टक्के महिला आणि 6 टक्के लहान मुलं होती. मजूरी, अवयव तस्करी, ड्रग पेडलिंग, लैंगिक शोषण, जबरदस्तीने लग्न करणं इत्यादी कारणांसाठी मानवी तस्करी केली जाते. महाराष्ट्राच्या बाबतीत, 95.6 तस्करीचं कारण जबरदस्ती वेश्याव्यवसायातून लैंगिक शोषण करणं हेच समोर आलं आहे.

2019 आणि 2018 च्या आकडेवारीच्या तुलनेत बेपत्ता महिलांच्या घटनांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018 मध्ये सर्वाधिक बेपत्ता झालेल्या मुलांसह महाराष्ट्र पहिल्या 10 राज्यांच्या यादीत नव्हता. पण आता तब्बल 4,562 मुलं बेपत्ता झाल्यानंतर आपलं राज्य राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचलं आहे.

सेक्स ट्रॅफिकिंग एक मोठी समस्या

ज्या चमकत्या शहरांमध्ये राहण्याचं सगळ्यांना आकर्षण असतं अशा मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन महानगरांमध्ये रेड-लाइट क्षेत्राचं मोठं जाळं तयार होत आहे. राज्यात लैंगिक तस्करीची ही प्रमुख ठिकाणं बनली आहेत. राज्यात या महानगरांना वगळता अनेक लहान शहरंदेखील सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये पुढे येत आहेत.

अपहरणाच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर…

देशात अपहरण आणि अपहरणांच्या घटनांमध्ये ०.7 टक्क्यांची घट झाली असली तरी ही फार शुल्लक घट आहे. कारण, महाराष्ट्रात महिलांवरील गुन्हे मोठ्या प्रमाणात होत आहेत. उत्तर प्रदेशनंतर 2019 मध्ये महाराष्ट्रात अपहरणाची सर्वाधिक प्रकरणं समोर आली. मागच्या वर्षाच्या तुलनेत या घटनांमध्येही 1.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

महिला अत्याचारांच्या घटना वाढल्या, मुख्यमंत्र्यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष, चित्रा वाघ यांचा आरोप

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, विधानसभेत आम्ही प्रस्ताव मांडू : किरीट सोमय्या