महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, विधानसभेत आम्ही प्रस्ताव मांडू : किरीट सोमय्या

महाराष्ट्रात ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit Somayya) यांनी केली आहे.

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, विधानसभेत आम्ही प्रस्ताव मांडू : किरीट सोमय्या


मुंबई : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (UP Yogi Adityanath Govt) सरकारने लव्ह जिहादविरोधात (Love Jihad) कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सरकार (Shivraj Sinh Chauhan) देखील योगी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने (Thackeray Govt) लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit Somayya) यांनी केली आहे. (Kirit Somaiya demand enactment of anti-love jihad law in Maharashtra)

महाराष्ट्रात आम्ही लव्ह जिहाद होऊ देणार नाही.  युपी सरकारने लव्ह जिहादवर कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे, त्यांचं आम्ही समर्थन करतो. यूपीसारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू, असं किरीट सोमय्या म्हणाले.

लव्ह जिहादवर बोलताना किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “अस्लम शेख यांनी याकूब मेननच्या फाशीला विरोध केला होता, फेनेटीक इस्लामिकऑरगनाझेशन संघटनेचं समर्थन केलं होतं. मात्र आम्ही महाराष्ट्रात लव्ह जिहाद होऊ देणार नाही”, असं सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी शिवसेनेलाही टार्गेट केलं. “सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचा रंग बदलला. अस्लम शेख लव्ह जिहादवर जी भाषा बोलतात तीच भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात”, अशी टीका सोमय्यांनी केली. यूपी सरकारने केलेल्या कायद्यानुसार महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा. विधानसभेत आम्ही प्रस्ताव मांडणार असल्याचं देखील सोमय्या म्हणाले.

योगी सरकार असंविधानिक, काँग्रेसची टीका

“विवाह हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे. या विषयावर निर्बंध आणणारा कायदा असंविधानिक असेल. प्रेमात जिहादची कुठलीही जागा असू शकत नाही”, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलीये. “भाजप देशात अशा प्रकारचं वातावरण तयार करतंय की लोकांना लग्नासाठी सरकारच्या सहानभूतीची आवश्यकता लागेल. भाजपचं हे काम व्यक्ती-स्वातंत्र्यावर घाला घालण्याचं काम आहे”, अशा शब्दात गेलहोत भाजपवर तुटून पडले.

लव्ह जिहाद रोखण्यासाठी प्रभावी कायदा आणणार- योगी

“लव्ह जिहाद रोखण्यासाठी लवकरच प्रभावी आणि कठोर कायदा आणू. खोट्या नावाने आणि वेश बदलून मुलींची होणारी फसवणूक आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही”, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यास ‘लव जिहाद’वर कायदा करणार : भाजप खा. लॉकेट चटर्जी

भाजप खासदार आणि पश्चिम बंगालच्या भाजप महासचिव लॉकेट चटर्जी (Locket Chatterjee) यांनी 2021 मध्ये भाजप सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये लव जिहाद (Love Jihad) विरोधात कायदा तयार करु, असा दावा केलाय.

(Kirit Somaiya demand enactment of anti-love jihad law in Maharashtra)

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याच्या तयारीत, देश तोडण्याचा डाव, काँग्रेसचा निशाणा

‘लव्ह-जिहाद’ रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात कडक कायदा; योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI