AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरीट सोमय्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांना सोमय्यांकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा

जमीन खरेदी प्रकरणावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. त्यावर शिवसेना नेत्यांनी सोमय्या यांच्यावर मानसिक उपचाराची गरज असल्याची टीका केली. त्या टीकेला उत्तर देताना सोमय्यांनी शिवसेना नेत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

किरीट सोमय्यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांना सोमय्यांकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा
| Updated on: Nov 14, 2020 | 11:26 AM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबांतील आर्थिक व्यवहाराबाबत गंभीर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर मानसिक उपचाराची गरज असल्याची टीका शिवसेना नेत्यांकडून करण्यात आली. त्यावर किरीट सोमय्या यांनी टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोमय्या यांनी ट्वीट करुन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ केल्या आहेत. (Happy Diwali to Shiv Sena leaders from Kirit Somaiya)

‘संजय राऊत, अनिल परब, रविंद्र वायकर, नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, गुलाबराव पाटील, चंद्रकांत खैरे अशा ठाकरे सरकारच्या डझनभर नेत्यांमध्ये मला मेंटल हॉस्पिटल आणि जेलमध्ये पाठवायची स्पर्धा आहे’ त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, असं ट्वीट करत सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांना एकप्रकारे चिमटाच काढला आहे.

जमीन खरेदी प्रकरणावरुन सोमय्या-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

अर्णव गोस्वामी अटक प्रकरणावरुन आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबाकडून रायगड जिल्ह्यातील रेवदंडा परिसरात जमीन विकत घेतल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसा 7/12 ही सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. हा 7/12 रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावे संयुक्तरित्या आहे. इतकच नाही तर रश्मी ठाकरे यांनी जमिनीचे एकूण 40 व्यवहार केले आहेत. त्यातील 30 व्यवहार हे एकट्या नाईक परिवारासोबत केल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, सोमय्या यांच्या दाव्याचा इन्कार शिवसेना नेत्यांकडून करण्यात आलेला नाही. उलट ही जमीन खरेदी करण्यात काय चूक आहे? असा प्रश्न शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी विचारला आहे.

जुनी थडगी उकराल तर तुमचे सांगाडे बाहेर येतील- राऊत

किरीट सोमय्या यांच्या दाव्यावर बोलावं असं काही महान काम त्यांनी केलेलं नाही. त्यांचा पक्षही त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर केली आहे. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांनी जुनी खडगी उकरायची बंद करावीत. नाहीतर आम्ही हे काम सुरु केल्यास त्यांचे सगळे सांगाडे सापडतील, असा इशाराच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना दिला आहे.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांच्या आरेला किरीट सोमय्यांचं कारेने उत्तर, थेट मुख्यमंत्री ठाकरेंना खडे सवाल

ईडी काही तुमच्या बापाची आहे का, असेल तर तुम्हाला 25 वर्ष घरी बसवू : संजय राऊत

एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते फालतू फडफड करतायत; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

Happy Diwali to Shiv Sena leaders from Kirit Somaiya

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.