नागपूरमध्ये चौथ्या मजल्यावरुन उडी घेत 24 वर्षीय तरुणीची आत्महत्या

नागपूरमध्ये एका 24 वर्षीय तरुणीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या (Girl Suicide nagpur) केली आहे.

नागपूरमध्ये चौथ्या मजल्यावरुन उडी घेत 24 वर्षीय तरुणीची आत्महत्या

नागपूर : नागपूरमध्ये एका 24 वर्षीय तरुणीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या (Girl Suicide nagpur) केली आहे. ही घटना काल (3 मार्च) दुपारी नागपूरमधील मानकापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली आहे. अंकिता माकोडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं (Girl Suicide nagpur) नाव आहे.

अंकिता नागपूरमधील राज पॅलेस या इमारतीमध्ये असलेल्या बीझ प्रोस्पेक्ट्स या कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल अंकिता तिच्या एका मित्रासोबत इमारतीच्या खाली उभी राहून बोलत होती. त्यावेळी दोघांमध्ये काहीसा वाद झाल्याचे अनेकांनी पाहिले होते.

वाद झाल्यानंतर अंकिता चौथ्या मजल्यावर गेली आणि तिने तिथून खाली उडी घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय अजून स्पष्ट नसले तरी आपल्या मित्रासोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर तिने असा टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे.


Published On - 7:50 am, Wed, 4 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI