‘नागरिक असो की पोलीस, नियम सर्वांना सारखेच’, बुलडाण्यात नियम मोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच दंड

| Updated on: Aug 29, 2020 | 5:52 PM

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस स्टेशन आवारात बेशिस्तपणे वाहनं लावून नियम मोडल्याने थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच दंड झालाय (Action against Police for no parking in Buldhana).

नागरिक असो की पोलीस, नियम सर्वांना सारखेच, बुलडाण्यात नियम मोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच दंड
Follow us on

बुलडाणा : वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी सामान्य जनतेला दंड केल्याचे आपण नेहमीच पाहतो. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस स्टेशन आवारात बेशिस्तपणे वाहनं लावून नियम मोडल्याने थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच दंड झालाय (Action against Police for no parking in Buldhana). त्यामुळे इतर बेशिस्त पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील स्पष्ट संदेश गेल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सध्या शहरात नागरिकांना कायम नियम दाखवणाऱ्या आणि स्वतः नियम न पाळणाऱ्या पोलिसांवरील कारवाईची चांगलीच चर्चा आहे.

खामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुकर यांनी ही कारवाई केली आहे. ते शुक्रवारी (28 ऑगस्ट) सायंकाळी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आले असता आपल्या केबिनमध्ये जात असताना पोलीस स्टेशन आवारामध्ये बेशिस्तपणे वाहन लावल्याचे त्यांच्या लक्षात आले. अगदी नो पार्किंगमध्ये देखील वाहनं उभे करुन नियम मोडण्यात आले होते. हे लक्षात येताच ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी आपल्याच 5 पोलीस कर्मचाऱ्यांना दंड ठोठावला.

हेही वाचा : वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला तुकाराम मुंढेंचा दणका, रस्ता खोदल्याने 1 लाख 92 हजारांचा दंड

विशेष म्हणजे खुद्द ठाणेदार नो पार्किंगच्या पावती फाडत असल्याचे लक्षात येताच इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने आपली वाहनं काढून पार्किंग एरियाच्या आतमध्ये पार्क केली. यानंतर दंड केलेले ते पाच कर्मचारी कोण? याची खामगाव शहरामध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे. तसेच पोलिसांमध्ये देखील शिस्तीचे धडे देण्याची गरज होती, ती यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचंही मत नागरिक व्यक्त करत आहेत.

यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतुकीलाही शिस्त लावण्याची मोहिम पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर हाती घेणार आहेत. त्यामुळे नागरिकांना शिस्त लावण्याआधी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या शिस्तीपासून सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या :

आईस्क्रिमसाठी MRP पेक्षा 10 रुपये जास्त, ग्राहक मंचाकडून 2 लाखाचा दंड, 6 वर्षे चाललेल्या खटल्याची भन्नाट कहाणी

श्वसनासंबंधी 20 आजारांसाठी मोफत उपचार, शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड, राजेश टोपेंच्या सूचना

माहुलमधील प्रदूषण भोवले, HPCL, BPCL सह चार कंपन्यांना 286 कोटींचा दंड

Action against Police for no parking in Buldhana