Sachiin Joshi |अटक झाल्याचे वृत्त ही केवळ अफवा, अभिनेता सचिन जोशीचे स्पष्टीकरण!

| Updated on: Oct 14, 2020 | 1:14 PM

चिडलेल्या सचिनने ‘अटकेचे वृत्त केवळ अफवा असून, खोटी माहिती देणाऱ्यांचा मी आता समाचार घेणार आहे’, असे म्हटले.

Sachiin Joshi |अटक झाल्याचे वृत्त ही केवळ अफवा, अभिनेता सचिन जोशीचे स्पष्टीकरण!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सचिन जोशीला (Actor Sachiin Joshi) मुंबई विमानतळावरून अटक (Arrest) करण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले होते. ‘सचिन जोशीला सोमवारी रात्री पोलीसांनी मुंबईतून अटक केली (Actor Sachin Joshi Arrest) असून, त्याला थेट हैद्राबादला नेण्यात आले आहे. त्याच्या अटकेचे कारण अद्याप समोर आले नसले, तरी ड्रग्ज प्रकरणात त्याचे नाव आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे’, असे वृत्त एका वेबसाईटने प्रकाशित केले होते. यावर चिडलेल्या सचिनने ‘अटकेचे वृत्त केवळ अफवा असून, खोटी माहिती देणाऱ्यांचा मी आता समाचार घेणार आहे’, असे म्हटले. (Actor Sachiin Joshi denied his Arrest from Mumbai Airport)

‘सचिन जोशी (Actor Sachiin Joshi) दुबईहून भारतात परत येत होता. मिळालेल्या माहितीनुसार, अटकेनंतर पोलीसांनी त्याला लगेच हैद्राबादला नेले आहे. सचिन जोशीला का अटक करण्यात आली (Actor Sachin Joshi Arrest), याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही’, असे या वृत्तात सांगण्यात आले होते.

बॉलिवूडसह टॉलिवूडचे मोठे नाव

सचिन जोशी हे मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. हिंदीबरोबरच तेलगू इंडस्ट्रीमध्येही त्याचे बरेच नाव आहे. सचिन जोशीने (Actor Sachin joshi) 2002मध्ये ‘मौमनेलानोई’ या तेलगू चित्रपटातून करिअरची सुरूवात केली होती.

सचिन जोशी, गुटखा किंग जगदीश जोशी यांचा मुलगा आहे. चार वर्षांपूर्वी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात गुटखा किंग जगदीश जोशी याचे नावदेखील आहे. जगदीश जोशी आणि ‘माणिकचंद गुटखा’चे रसिकलाल धारीवाल यांनी आपापसांतील त्यांचे प्रकरण सोडविण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मदत घेतल्याचे, सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले होते. (Actor Sachiin Joshi denied his Arrest from Mumbai Airport)

अभिनया व्यतिरिक्त सचिन जोशी त्याच्या श्रीमंत राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतो. 2017 मध्ये त्याने विजय मल्ल्याचा गोव्यातील ‘किंगफिशर व्हिला’ बँकेच्या लिलावात 73 कोटी रुपयांत खरेदी केला. या बंगल्याच्या खरेदीमुळे तो खूप चर्चेत आला होता.

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचे जाळे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ‘ड्रग्ज कनेक्शन’ समोर आले आहे. सुशांत प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत दोन एफआयआर दाखल केल्या आहेत. तर, याच प्रकरणात रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि ड्रग्ज तस्करांच्या चौकशीदरम्यान ज्यांची नावे समोर आली आहेत त्यांना एनसीबीकडून समन्स बजावून, अटकही करण्यात आली आहे. तर, आणखी 50 बॉलिवूड सेलिब्रिटी सध्या एनसीबीच्या रडारवर आहेत. यात अनेक प्रसिध्द अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि बी-ग्रेड चित्रपटाच्या निर्मात्यांची नावे असल्याचे म्हटले जात आहे. (Actor Sachiin Joshi denied his Arrest from Mumbai Airport)

क्वान कंपनीची कर्मचारी जया साहाच्या चौकशी दरम्यान दीपिका पदुकोण, सिमॉन खंबाटा आणि करिश्मा प्रकाश यांची नावे समोर आली आहेत. तर, रकुलप्रीत सिंह आणि सारा अली खान यांची नावे रिया चक्रवर्तीने घेतली होती. यापैकी करिश्मा प्रकाश दीपिका पदुकोणची मॅनेजर असून, तिने दीपिकासाठी ड्रग्जची सोय केली होती. या सगळ्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे.

(Actor Sachiin Joshi denied his Arrest from Mumbai Airport)