हेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त, दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई

दिल्ली एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. यात हेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त करण्यात आलं आहे (NCB busted international drugs syndicate in Delhi).

हेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त, दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई

नवी दिल्ली : सध्या देशभरात ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून कारवाई सुरु आहेत. त्यातच आता दिल्ली एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. यात हेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त करण्यात आलं आहे (NCB busted international drugs syndicate in Delhi). या कारवाईत दिल्ली एनसीबीने 8 किलो हेरॉईन, 455 ग्रॅम कोकेन, 1 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी भारतातील आफ्रिकन ड्रग्स स्मगलरला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 1 किलो 750 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणाच्या तपासात भारतातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे रॅकेट सुरु असल्याचं समोर आलं. यानंतर एनसीबीने ही धडक कारवाई करत ड्रग्जचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या रॅकेटमध्ये मागील काही महिन्यांमध्ये 52 किलो ड्रग्सची तस्करी केल्याचं तपासात उघडकीस आलं आहे.

एनसीबीने अटक केलेल्यांमध्ये 2 आफ्रिकन आणि एक बुर्मी नागरिकाचाही समावेश आहे. एनसीबीने सुरुवातीला दिल्लीत 1 सप्टेंबर 2020 रोजी 970 ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. त्याचा तपास केला असता गुप्त माहिती आणि डिजीटल फुटप्रिंटवरुन एनसीबीला या आंतरराष्ट्रीय रॅकेटची माहिती मिळाली. त्यानुसार येणाऱ्या काळात अशाप्रकारचे ड्रग्जचे आणखी पार्सल येणार असल्याचं स्पष्ट झालं.

या रॅकेटमध्ये गुन्हेगारांकडून अनेक बनावट शासकीय ओळखपत्रांचा वापर करण्यात आला. याचा मास्टरमाईंड विदेशातून या रॅकेटची सूत्रं हलवत होता. ही ड्रग्ज तस्करी पकडली जाऊ नये म्हणून तस्करांकडून अनेक स्तरावर हे काम केलं जात होतं. मात्र, एनसीबीच्या कारवाईने हे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त झालं आहे.

संबंधित बातम्या :

ड्रग्ज प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघड, बॉलिवूडच्या चार बड्या अभिनेत्रींना NCB समन्स बजावणार

Bollywood Drugs Case | अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांना एनसीबीचा समन्स

Bollywood Drugs Case | “होय, मी ड्रग्ज घेतलं” रिया चक्रवर्तीची एनसीबीच्या चौकशीत कबुली

संबंधित व्हिडीओ :

NCB busted international drugs syndicate in Delhi

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *