Bollywood Drugs Case | अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांना एनसीबीचा समन्स

सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ,सिमॉन खंबाटा आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीकडून या आठवड्यात समन्स पाठवण्यात येणार NCB to probe Shraddha Kapoor

Bollywood Drugs Case | अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांना एनसीबीचा समन्स

मुंबई :अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्याने आता एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत आहे. एनसीबीच्या तपासादरम्यान सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह अन्य आरोपींना एनसीबीने अटक केली आहे. प्रख्यात अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावं एनसीबीच्या चौकशीत आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने घेतली आहेत. आता या यादीत अभिनेत्री श्रद्धा कपूरचेही नाव असल्याची माहिती आहे. (NCB to probe Shraddha Kapoor)

कलाकारांच्या यादीतील सारा अली खान, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ,फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीकडून या आठवड्यात समन्स पाठवण्यात येणार आहे. सोमवारी एनसीबीकडून सुशांतची पूर्व मॅनेजर श्रुती आणि जया शहा यांची चौकशी करण्यात आली आहे.

रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ड्रग्जचे सेवन करण्यास सुरुवात केली असल्याचा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संपूर्ण टीम ड्रग्ज घेत होती, शूटिंग संपल्यानंतर सुशांत आणि सारा अली खान दोघांचेही वजन वाढलेले होते असंही रिया म्हणाली आहे.

एनसीबीने विचारलेल्या 55 व्या प्रश्नाचे उत्तर देताना रियाने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. एनसीबी अधिकाऱ्यांनी “जर तू ड्रग्जचे सेवन करत नसशील, तर तू ड्रग्ज तस्कर आहेस आणि हाही एक भयंकर गुन्हाच आहे” असे दटावल्यानंतर रियाने आपण ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिली. असे वृत्त रिपब्लिक वाहिनीने दिले आहे. ही माहिती लपवण्यासाठी आपल्या टीमनेच सांगितल्याचा दावा रियाने चौकशीत केला.

दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 22 सप्टेंबरपर्यंत भायखळ्याच्या तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी रियाने जामीन मिळावा यासाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज दाखल केला होता. “आपण निरपराध आहोत. आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आलं आहे. यामुळे आपल्याला जामीन द्यावा,” असं तिने आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं. मात्र मुंबई सेशन कोर्टाने तिचा अर्ज फेटाळून  लावला होता.

 

NCB च्या गळाला बडा मासा

सुशांत सिंग ड्रग्स प्रकरणात अटक आरोपी अंकुश अरनेजा याच्या चौकशीत महत्वाची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी राहील रफत विश्राम उर्फ सॅम याला अटक करण्यात आली आहे.सॅम हा फिल्म क्षेत्रातील अनेकांना ड्रग्स देत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

संबंधित बातम्या 

Bollywood Drugs Case | “होय, मी ड्रग्ज घेतलं” रिया चक्रवर्तीची एनसीबीच्या चौकशीत कबुली

ड्रग्ज कनेक्शनमध्ये रियाकडून बॉलिवूड अभिनेत्रींची नावे, सारा अली खान आणि रकुल प्रीत NCB च्या रडारवर?

(NCB to probe Shraddha Kapoor)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *