खाणाऱ्यांना खाऊ द्या आणि लवकर मरु द्या : सयाजी शिंदे

पुण्यात सयाजी शिंदे यांनी लिहिलेल्या 'तुंबारा' पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला.

खाणाऱ्यांना खाऊ द्या आणि लवकर मरु द्या : सयाजी शिंदे

पुणे : “झाड म्हणत नाही की, हा भ्रष्टाचारी आहे. मात्र खाऊन मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. उपाशीपोटी मरणाऱ्यांची संख्या कमी आहे. खाऊन जास्त आजार होतात. मात्र खाणाऱ्यांना खाऊ द्या आणि लवकर मरु द्या”, असं प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (actor Sayaji Shinde) म्हणाले आहेत. पुण्यात सयाजी शिंदे यांनी लिहिलेल्या ‘तुंबारा’ पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते (actor Sayaji Shinde).

“आतापर्यंत घरांसाठी लोकांनी झाडं तोडली. मात्र आता घर पाडून झाडं लावायला पाहिजे, झाडं लावणं हा थँक्सलेस जॉब असून इथं प्रसिद्धी मिळत नाही. वृक्ष हे तपस्वी ऋषीसारखे आहेत. मात्र तपश्चर्याला बसलेल्या ऋषींची कत्तल केली जात आहे. त्यामुळे आता जनजागृतीसाठी वृक्ष संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील डोंगरावर 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी वृक्ष संमेलन होणार आहे. यामध्ये वडाचं झाड हे या संमेलनाचं अध्यक्ष असणार आहे. वृक्ष संमेलन संकल्पना जिल्हापुरती असून जिल्ह्यात वृक्षसुंदरीच किताब दिला जाणार आहे. विश्वसुंदरी पेक्षा वृक्षसुंदरी असावी. प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी वेगवेगळ्या संमेलन करण्याचे संकल्पना आहे”, अशी माहिती सयाजी शिंदे यांनी दिली.

गेल्या तीन वर्षांपूर्वी अभिनेता सयाजी शिंदे त्यांच्या टीमसह वनविभागाकडून बीडच्या पालवन येथे देवराई प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. येत्या जानेवारी या प्रकल्पाला तीन वर्ष पूर्ण होणार असल्याने याठिकाणी वृक्ष संमेलन घेण्यात येणार आहे. या वृक्ष संमेलनानिमित्त “येऊन येऊन येणार कोण…? झाडांशिवाय आहेच कोण…?” अशी घोषणा सयाजी शिंदे यांनी पालवन येथे गेल्या आठवड्यात केली होती.

बीड शहरापासून अवघ्या दहा किमी अंतरावर 207 हेक्टरवर देवराई प्रकल्प उभा आहे. यात 1 लाख 64 हजार विविध जातींच्या वृक्षाची लागवड करण्यात आली (sahyadri devrai actor Sayaji Shinde) आहे. याची जोपासना टँकरच्या पाण्यावर केली जात आहे. तीन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या प्रकल्पावर सध्या हिरवळ पसरली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI