AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajal Aggarwal | काजल अग्रवालच्या लग्नाची तयारी सुरू, नव्या घरात शिफ्ट होणार!

‘सिंघम’ फेम दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत खूप व्यस्त आहे.

Kajal Aggarwal | काजल अग्रवालच्या लग्नाची तयारी सुरू, नव्या घरात शिफ्ट होणार!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 21, 2020 | 6:54 PM
Share

मुंबई : ‘सिंघम’ फेम दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत खूप व्यस्त आहे. काजल 30 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गौतम किचलूसोबत लग्न करणार आहे. तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी हा एक खास दिवस असणार आहे. काजलने तिच्या लग्नाची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली होती. मुंबईत हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे म्हटले होते. कोरोनामुळे, केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे या मित्र लग्नात सामील होणार आहेत.( Actress Kajal Aggarwal marriage update  shifting in new house)

लग्नाच्या तयारीत व्यस्त असणाऱ्या काजलने नुकताच तिच्या नवीन घराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा होणारा नवरा गौतम किचलू तिला घर सेट करण्यात मदत करताना दिसत आहे. लग्नानंतर दोघेही या नव्या घरात राहायला येणार आहेत. या पोस्टवर तिच्या खास मैत्रिणीने कमेंट केली की, ‘आता काजलला वधूवेशात पाहण्यासाठी वाट बघवत नाहीय. मी लवकरच हैदराबादहून मुंबईत काजलच्या लग्नासाठी येणार आहे.’

काजल अग्रवालने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लवकरच लग्न करत असल्याची घोषणा केली होती. याचबरोबर तिने एक खास कार्ड पोस्ट केले होते. या निमंत्रण पत्रिकेत, ‘ती 30 ऑक्टोबरला गौतम किचूलसोबत लग्न करणार असून, कोरोना संसर्ग पाहता काजलच्या लग्नाच्या कार्यक्रमांना अतिशय खासगी ठेवण्यात येणार आहे. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्यांचाच सहभाग असणार आहे’, असे म्हटले होते.

View this post on Instagram

♾??

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

आपण 2020मध्ये लग्न करणार असून, चित्रपट सृष्टीशी संबंधित व्यक्तीशी लग्न गाठ बांधणार नसल्याचे तिने म्हटले होते. (Actress Kajal Aggarwal marriage update  shifting in new house)

धमाकेदार बॅचलर पार्टी

काजलने तिची बहिण निशासोबत धमाकेदार बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. यात ती आणि बहिण दोघीही धमाल करताना दिसल्या होत्या. बहिण निशाला काजल सगळ्यात जवळची मैत्रीण मानते. दोघी एकत्र फोटो शेअर करत असतात. काजलची बहिण निशा फॅशन डिझायनर असून, त्या दोघी नेहमी एकत्र फोटोशूट करत असतात.

View this post on Instagram

?

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

व्यावसायिकाशी बांधणार लग्नगाठ

काजल अग्रवाल पेशाने व्यावसायिक असणाऱ्या गौतम किचलूशी विवाह करणार आहे. गौतम इंटेरीअर डिझायनर असून त्याची स्वतःची कंपनी आहे. या व्यतिरिक्त त्याला परदेशात फिरण्याची आवड आहे.

View this post on Instagram

♾?

A post shared by Gautam Kitchlu (@kitchlug) on

(Actress Kajal Aggarwal marriage update  shifting in new house)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा