कंगनाच्या बहिणीची आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता आदित्य पांचोली यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. अभिनेत्री कंगना राणावतच्या बहिणीने अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. ई मेलद्वारे वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.  दुसरीकडे आदित्य पांचोलीने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. सुमारे 13 वर्षांपूर्वीचं हे […]

कंगनाच्या बहिणीची आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता आदित्य पांचोली यांच्यातील वाद पुन्हा उफाळला आहे. अभिनेत्री कंगना राणावतच्या बहिणीने अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. ई मेलद्वारे वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.  दुसरीकडे आदित्य पांचोलीने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. सुमारे 13 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे.

काही वर्षांपूर्वी कंगना आणि आदित्य पांचोली हे दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. मात्र दोघांमधील वादाने टोक गाठलं आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीत आदित्य पांचोलीविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

आदित्य पांचोलीचीही तक्रार

दरम्यान, आदित्य पांचोलीनेही काही दिवसांपूर्वी कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार त्या तक्रारीला उत्तर आहे जे दशकापूर्वी कंगना आणि तिची बहीण रंगोलीने दाखल केली होती. कंगना आणि तिच्या बहिणीने आदित्य पांचोलीविरोधात मारहाण आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

आदित्य पांचोलीही आता कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कंगनाच्या वकिलाने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आदित्यचा आहे. त्यासाठी आदित्य पांचोलीने काही व्हिडीओ, फोन रेकॉर्डिंग पोलिसांना दिले आहेत.

आदित्य पांचोलीबाबत कंगना काय म्हणाली होती?

आदित्य पांचोलीचं नाव न घेता कंगना म्हणाली होती, “आम्ही पती-पत्नीप्रमाणे रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही दोघांसाठी एक घरही पाहात होतो. एका मित्राच्या घरी आम्ही दोघे एकत्र 3 वर्ष राहिलो. मी जो फोन वापरत होते तो सुद्धा त्यांचाच होता.

तो माणूस माझ्या वडिलांच्या वयाचा होता. त्याने मला मारहाण केली. त्यावेळी माझं वय 17 वर्षे होतं. मला मारहाण झाल्याने डोक्यातून रक्त येत होतं. मी त्यावेळी माझं चप्पल काढून त्याच्या डोक्यात मारलं होतं. त्यामुळे त्याच्या डोक्यातूनही रक्त येत होतं. मी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता”.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.