चंद्रपुरात विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात भेसळयुक्त मीठ

विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात वापरले जाणारे मीठ भेसळयुक्त असल्याचा आरोप चंद्रपूरमधील शिक्षक आणि पालकांनी केला (Adulterated salt in chandrapur school) आहे.

चंद्रपुरात विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात भेसळयुक्त मीठ
Follow us
| Updated on: Mar 14, 2020 | 10:54 PM

चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात वापरले जाणारे मीठ भेसळयुक्त असल्याचा आरोप चंद्रपूरमधील शिक्षक आणि पालकांनी केला (Adulterated salt in chandrapur school) आहे. त्यामुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना चंद्रपुरातील राजुरा तालुक्यात घडली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या पुरवठाधारकावर कारवाईची मागणी पालक आणि शिक्षकांनी (Adulterated salt in chandrapur school) पुढे रेटली आहे.

शाळेत विद्यार्थ्याची उपस्थिती वाढावी, कुपोषण मुक्त सकस आहार मिळावा म्हणून शालेय मध्यान्ह भोजन योजना सुरु करण्यात आली. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी अशा 1 ते 8 इयत्तांच्या 161 वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजने अंतर्गत साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट गोंदिया येथील श्रीकृष्ण असोसिएट्स यांना देण्यात आले आहे.

या पुरवठा धारककडून मिळणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहेत, अशा तक्रारी याधीही बऱ्याचदा करण्यात आल्या आहेत, असं स्थानिकांनी सांगितले. दरम्यान या सत्रातील दिनांक 17 फेब्रुवारीला पुरवण्यात आलेल्या साहित्यातील ‘टापकूक’ नावाचे मीठ निकृष्ठ दर्जाचे भेसळयुक्त असल्याचे उघडकीस आले. हे मीठ पाण्यात टाकून हलवले तरी विरघळत नाही. पाण्यावर स्फटिकाप्रमाणे मूलद्रव्य तरंगत असते आणि पाण्याचा थोडा काळपट रंग येतो, असा दावा पालकांनी केला आहे.

हे मीठ परीक्षणासाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले असून अहवाल येईपर्यंत हे मीठ पोषण आहारात वापरु नये, अशा सूचना सर्व शाळांना देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुख्याध्यापकांनी दोषी कंत्राट रद्द करावे अशी मागणी केली आहे. ही बातमी तालुक्यात पसरताच सर्व शाळा मुख्याध्यापकांनी हे मीठ वापरणे बंद केले आहे.

Non Stop LIVE Update
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.