वडाभोवती गर्दी नको, वटपौर्णिमा घरीच साजरी करा, पोलिसांचे आदेश

यंदाची वटसावित्री पौर्णिमा महिलांनी घरच्या घरी साजरी करावी, असे आवाहन अहमदनगर पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

वडाभोवती गर्दी नको, वटपौर्णिमा घरीच साजरी करा, पोलिसांचे आदेश
vatsavitri purnima
| Updated on: Jun 04, 2020 | 6:48 PM

अहमदनगर : यंदाची वटसावित्री पौर्णिमा महिलांनी (Vatsavitri Pournima) घरच्या घरी साजरी करावी, असे आवाहन अहमदनगर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर पोलिसांनी हे आवाहन केलं (Vatsavitri Pournima) आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. अहमदनगरमध्येही कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक आदेश (कलम 144 ) लागू आहेत. त्यामुळे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांनी घरच्या घरी पुजा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, वडाच्या झाडाभोवती गर्दी झाल्यास कायदेशीर आदेशाचे उल्लंघन होईल, असंही अहमदनगर पोलिसांनी म्हटलं.

अहमदनगर पोलिसांनी वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर काही सूचना जारी केली आहे. यामध्ये महिलांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे (Vatsavitri Pournima). तसेच, वडाच्या झाडा जवळ गर्दी झाली तर कायदेशीर आदेशाचे उल्लंघन तर होईलच, पण आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते, त्यामुळे घराबाहेर पडू नये, अस आवाहन पोलिसांनी केलं आहे.

शिवाय, कोणत्याही परिस्थितीत लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडू नका, गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्या, आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने यांची काळजी घ्या, असंही अहमदनगर पोलिसांनी सांगितलं (Vatsavitri Pournima) आहे.

संबंधित बातम्या :

संकटकाळात महाराष्ट्र एक, मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे आभार : मुख्यमंत्री

‘निसर्ग चक्रीवादळाचा फटका, रायगडला विशेष आर्थिक पॅकेज द्या’, अदिती तटकरे मागणी करणार