अक्षयच्या 6 वर्षीय मुलीचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार फिटनेसबद्दल खूप काळजी घेत असतो. त्यामुळे अक्षयचा फिटनेस कमाल आहे. आता अक्षयाच्या वर्कआऊटची भुरळ चक्क मुलगी नितारा कुमार हिला देखील पडली आहे. याबाबतचा व्हिडीओ स्वत: अक्षयने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नितारा वर्कआऊट करताना दिसते आहे. नितारा ही सहा वर्षाची आहे. एवढ्या लहान वयात नितारा आपल्या वडिलांच्या पावलावर […]

अक्षयच्या 6 वर्षीय मुलीचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार फिटनेसबद्दल खूप काळजी घेत असतो. त्यामुळे अक्षयचा फिटनेस कमाल आहे. आता अक्षयाच्या वर्कआऊटची भुरळ चक्क मुलगी नितारा कुमार हिला देखील पडली आहे. याबाबतचा व्हिडीओ स्वत: अक्षयने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नितारा वर्कआऊट करताना दिसते आहे.

नितारा ही सहा वर्षाची आहे. एवढ्या लहान वयात नितारा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मोठी होत आहे. या व्हिडीओमध्ये नितारा दोरीच्या मदतीने एक्सरसाईज करत आहे. तर तिच्या मागे उभ राहून अक्षय ट्रेनिंग देत आहे.

अक्षयचा वर्कआऊट प्लॅन

– अक्षय रोज पहाटे साडेचार वाजता उठतो. त्यानंतर एक तास स्विमिंग करतो.

– एक तास मार्सल आर्टस् चा सराव करतो.

– तसेच, हे सर्व झाल्यानंतर योग आणि एक तास मेडिटेशन देखील करतो.

अक्षय कुमारच्या या वर्कआऊटची बॉलिवूड, फिटनेससह सर्वच क्षेत्रात चर्चा असते. शिवाय, अक्षय कुमारही त्याच्या अनेक मुलाखती आणि इतर ठिकाणी आपला फिटनेस फंडा सांगत असतो. आता त्याची मुलगीही तिच्या पप्पांच्या पावलांवर पाऊल टाकताना दिसते आहे.