AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप; प्रकल्पग्रस्त‘आयटीआय’धारकांना ‘महावितरण’मध्ये नोकरी; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्राच्या विकासात कोयना धरणाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. कोयना धरणासाठी बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप; प्रकल्पग्रस्त‘आयटीआय’धारकांना ‘महावितरण’मध्ये नोकरी; उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकImage Credit source: Twitter
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Apr 05, 2022 | 7:58 PM
Share

मुंबई: कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या (Dam project affected) जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. कोयना धरणाच्या (Koyana Dam) वर्धापनदिनी (दि.16 मे) प्रातिनिधीक स्वरुपात प्रलंबित पात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे प्रत्यक्ष वाटप करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे प्रलंबिक प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (व्हिसीद्वारे), वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे, श्रमिक मुक्तीदलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कार्याध्यक्ष संपत देसाई आदी मान्यवरांसह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोयना धरणाचे मोठे योगदान

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात कोयना धरणाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. कोयना धरणासाठी बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.

मागणीप्रमाणे जमिनीचे वाटप

प्रकल्पग्रस्तांच्या संकलन यादीच्या अद्ययावतीकरणाचे काम बहुतांशपणे पूर्ण झाले असून या पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, सोलापूर, सातारा, रायगड जिल्ह्यातील जमीन वाटपाची प्रक्रिया दि. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पात्र प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप प्रक्रीया सुरु करण्यासाठी प्रमाणिक संचालन पध्दती (एसओपी) तयार करण्यात करुन उपलब्ध जमिनीची यादी आणि प्रक्रियेसाठी भरावयाचा अर्ज प्रसिध्द करण्यात येणार असून त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून प्रकल्पग्रस्तांच्या मागणीप्रमाणे जमिनीचे वाटप करण्यात यावे. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ‘आयटीआय’ प्रमाणपत्रधारक पाल्यांना ‘महावितरण’मध्ये प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Jayant Patil : राऊतांवर दबाव आणण्यासाठी संपत्ती जप्त, सरकारबद्दल शंका निर्माण करण्यासाठी ईडीचा वापर-जयंत पाटील

Yashomati Thakur: पुन्हा महाराष्ट्रच अव्वल! पोषण पंधरवड्यात गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्याला टाकले मागे

Raju Shetty : आधी आमदाराला बाहेरचा रस्ता, आता महाविकास आघाडीला रामराम! स्वाभिमानीत नेमकं काय घडतंय?

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?