अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमध्ये बेछूट गोळीबार, 20 जणांचा मृत्यू, 26 जखमी

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील वॉलमार्ट स्टोरमध्ये (Walmart Store) गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 20 जणांचा मृत्य़ू झाला असून 26 जण जखमी असल्याचे बोललं जात आहे.

अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमध्ये बेछूट गोळीबार, 20 जणांचा मृत्यू, 26 जखमी
| Edited By: | Updated on: Aug 04, 2019 | 11:13 AM

वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेतील टेक्सास राज्यातील वॉलमार्ट स्टोअरमध्ये (Walmart Store) गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 20 जणांचा मृत्य़ू झाला असून 26 जण जखमी असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केलं आहे. आज टेक्सासमध्ये भ्याड हल्ला झाला. मी माझ्या देशातील प्रत्येक नागिराकांच्यासोबत आहे. आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. कोणतेही कारण आणि निमित्त नसताना हा हल्ला केला आहे, असं ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं

स्थानिक रिपोर्टनुसार वॉलमार्ट स्टोअरमध्ये गोळीबार झाला आणि यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. एका कर्मचाऱ्याने स्थानिक वृत्तसंस्थेला सांगितले की, सध्या पोलिसांनी मॉलमधील सर्वांना बाहेर काढून तपास करत आहेत. पोलिसांना या वॉलमार्ट स्टोअरपासून लोकांना दूर राहण्याचे आवाहन केलं आहे.

यापूर्वीही जूनच्या शेवटच्या आठवड्यात टेक्सासमध्ये गोळबाराची घटना घडली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता, तर इतर दोनजण जखमी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.