अमिताभ बच्चन तीन दिवसांपासून रुग्णालयात, चाहत्यांची चिंता वाढली

| Updated on: Oct 18, 2019 | 2:11 PM

महानायक अमिताभ बच्चन हे गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात भर्ती आहेत (Amitabh Bachchan is hospitalized). अमिताभ बच्चन यांना यकृतासंबंधी समस्या असल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अमिताभ बच्चन तीन दिवसांपासून रुग्णालयात, चाहत्यांची चिंता वाढली
Follow us on

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन हे गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात आहेत (Amitabh Bachchan is hospitalized). अमिताभ बच्चन यांना यकृतासंबंधी समस्या उद्भवल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिग बी यांच्या यकृताचा आजार सर्वांना माहित आहे. त्यांचं यकृत केवळ 25 टक्के काम करत असल्याचं त्यांनी स्वत: अनेकदा सांगितलं आहे (Amitabh Bachchan is hospitalized). कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर त्यांना यकृताची समस्या सुरु झाली.

अमिताभ मंगळवारी रात्री 2 वाजता रुग्णालयात दाखल

रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी (18 ऑक्टोबर) रात्री अमिताभ यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांना रात्री दोन वाजताच्या सुमारास नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल होऊन आता तीन दिवस झाले आहेत. रुग्णालयात अमिताभ यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, बिग बी हे रुग्णालयात असल्याची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

‘कुली’च्या शूटिंग दरम्यान दुखापत

1982 मध्ये ‘कुली’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एक स्टंट करताना अमिताभ यांच्या पोटाला गंभीर इजा झाली होती. अमिताभ यांना त्याच अपघातानंतर यकृताची समस्या सुरु झाली. त्यांचं यकृत 75 टक्के काम करणे बंद झालं. सिरोसिसमुळे त्यांना ही समस्या उद्भवली.

अमिताभ यांना दुखापत झाली, तेव्हा चुकीने त्यांच्या शरीरात एका अशा डोनरचं रक्त पुरवण्यात आलं ज्याला हिपेटायटिस-बी वायरस होता. यामुळे अमिताभ यांचा यकृताचा आजार आणखी वाढला.