कंगना रनौतला मोठा झटका; न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश

| Updated on: Oct 29, 2020 | 5:39 PM

काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी वांद्रे न्यायालयाने पोलिसांना कंगना रानौत हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. | Kangana ranaut

कंगना रनौतला मोठा झटका; न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश
Follow us on

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांची चौकशी करण्याचे आदेश अंधेरी येथील मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिले आहेत. न्यायालयाचा हा निर्णय कंगना रनौत हिच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. कंगनावर वादग्रस्त वक्तव्ये करुन समाजामध्ये तेढ पसरवल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी वांद्रे न्यायालयाने पोलिसांना कंगना रानौत हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता पोलिसांना कंगनाच्या चौकशीची मुभा मिळाल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Courts orders probe of Kangana Ranaut)

कंगना रनौत हिने मध्यंतरी बॉलीवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगना रनौत हिने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. पोलीस कंगना रनौत हिच्यावरोधात तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते, असेही याचिकेत सांगण्यात आले होते. यानंतर वांद्र न्यायालयाने कंगना रनौत हिच्यावरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्च
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut Case) विरुद्धच्या खटल्यासाठी महापालिकेने (BMC) आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या एच पश्चिम विभागीय कार्यालयाने कंगना रनौतच्या वांद्रे पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. याप्रकरणी कंगना रनौतने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती (Kangana Ranaut Case).याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारात दिली आहे.

संबंधित बातम्या:

Kangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्च

उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही : कंगना रनौत

‘यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?’ दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या टीकेला कंगना रनौतचा प्रत्युत्तर

(Courts orders probe of Kangana Ranaut)