AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर ती अण्णांची आत्महत्या ठरेल: डॉक्टर

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जास्त दिवस उपोषण करु शकत नाहीत. अण्णांचा रक्तदाब सतत कमी जास्त होत आहे. त्यांच्या किडनीतील रक्तपुरवठा कमी होतोय. त्यामुळे अण्णांनी उपोषण सुरु ठेवल्यास ही आत्महत्या असेल, अशी प्रतिक्रिया अण्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी टीव्ही 9 मराठीला दिली. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन […]

... तर ती अण्णांची आत्महत्या ठरेल: डॉक्टर
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जास्त दिवस उपोषण करु शकत नाहीत. अण्णांचा रक्तदाब सतत कमी जास्त होत आहे. त्यांच्या किडनीतील रक्तपुरवठा कमी होतोय. त्यामुळे अण्णांनी उपोषण सुरु ठेवल्यास ही आत्महत्या असेल, अशी प्रतिक्रिया अण्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी टीव्ही 9 मराठीला दिली. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषणाला सुरुवात केली आहे.

उपोषणामुळे अण्णांच्या किडनीसह मुख्य अववयांवर परिणाम होत आहे. 10 ते 11 दिवस उपोषण चालू राहिलं तर आत्महत्या ठरेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.

अण्णांचं वजन 3 किलोने घटलं दरम्यान, आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अण्णांचे वजन 3 किलो 400 ग्रॅमने घटले. नियमित आणि शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आज अण्णांची तपासणी केली. रक्तदाब स्थिर, मात्र जास्त न बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी अण्णांना दिला.

वाचा: आपका खत मिला, शुभकामना के साथ धन्यवाद, PMO चं अण्णांना एका ओळीचं पत्र

PMO चं 1 ओळीचं पत्र अण्णांना पंतप्रधान कार्यालयाने 1 ओळीचं पत्र पाठवलं. ‘आपका 1 जनवरी का खत मिला, शुभकामना के साथ धन्यवाद’ केवळ इतकाच उल्लेख या पत्रात आहे. पीएमओ कार्यालयाच्या एका ओळीच्या उत्तराने अण्णा नाराज झाले आहेत. मागण्यांकडे केंद्र सरकारचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.

गावकऱ्यांचं आंदोलन

दुसरीकडे चौथ्या दिवशीही सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याने, राळेगणसिद्धीच्या गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावकऱ्यांनी आज जेलभरो आंदोलन केलं. गावातील काही तरुण थेट टॉवरवर चढले. ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरले. पारनेर वाडेगव्हान हा रस्ता रोखून गावकऱ्यांनी आंदोलन केलं. मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी आज राळेगणसिद्धीच्या आंदोलक गावकऱ्यांना ताब्यात घेतलं. महिलांसह वृद्धांचाही यामध्ये समावेश आहे. त्याआधी गावकऱ्यांनी काल थाळीनाद आंदोलन केलं होतं.

राज्य सरकारचं आवाहन

दरम्यान, आम्ही अण्णा हजारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण अण्णा चर्चेला तयार नव्हते. आम्ही अण्णा हजारे यांच्या 80% मागण्या मान्य केल्या आहेत. अण्णा यांनी वय आणि प्रकृती लक्षात घेता हे उपोषण करु नये, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री अण्णा हजारे यांच्यासोबत बोलले होते. पुन्हा मी दोन दिवसांनी अण्णा हजारे यांना भेटायला जाणार आहे. या विषयावर 2 दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तर अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, असं आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

संबंधित बातम्या 

आपका खत मिला, शुभकामना के साथ धन्यवाद, PMO चं अण्णांना एका ओळीचं पत्र

सत्ताधारी असो किंवा विरोधक, लोकपालला सगळेच का घाबरतात?  

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं आजपासून उपोषण      

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस 

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.