बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ तारखेपासून परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. (HSC Students Application Form)

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' तारखेपासून परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात
प्रतिकात्मक फोटो

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. बारावीतील नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि एखादा विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 15 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. (HSC Students Application Form)

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना 15 डिसेंबर ते 4 जानेवारीदरम्यान परीक्षेसाठी अर्ज करता येतील. तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रम इत्यादी विद्यार्थ्यांना 5 ते 18 जानेवारीदरम्यान अर्ज भरता येईल.

शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरल्यानंतर शुल्क चलनाद्वारे 15 डिसेंबर ते 25 जानेवारीदरम्यान बँकेत भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या यादी आणि प्री-लिस्ट चलनासोबत 28 जानेवारीला विभागीय मंडळात जमा करायची आहे.

तसेच यंदा नव्याने 17 नंबरच्या अर्जाद्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी या कालावधीत अर्ज करु नये, अशी सूचना डॉ. भोसले यांनी केली आहे.(HSC Students Application Form)

संबंधित बातम्या : 

राज्य अनलॉक, आता पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार : आदित्य ठाकरे

Photos | श्रमदानातून कायापालट, यशोगाथा नाशिकच्या आदिवासी भागातील झारवड खुर्द शाळेची

Weather Alert : राज्यासाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI