औरंगाबादमध्ये बारचालकाने घरात घुसून पेटवलेल्या महिलेचा मृत्यू

जिवंत जाळण्यात आलेल्या औरंगाबादमधील महिलेचा अखेर मृत्यू (Aurangabad Lady Set on Fire) झाला आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी महिलेची मृत्यूशी झुंज संपली आहे.

औरंगाबादमध्ये बारचालकाने घरात घुसून पेटवलेल्या महिलेचा मृत्यू


औरंगाबाद : जिवंत जाळण्यात आलेल्या औरंगाबादमधील महिलेचा अखेर मृत्यू (Aurangabad Lady Set on Fire) झाला आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी महिलेची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात ही हादरवून टाकणारी घटना समोर (Aurangabad Lady Set on Fire) आली होती.

महिला 95 टक्के भाजली असल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु होते. या प्रकरणातील आरोपी संतोष मोहिते याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, पीडित महिला रविवारी (2 फेब्रुवारी) घरी एकटीच असताना रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपी तिच्या घरात घुसला. रात्रीच्या वेळेत घरी येण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावरुन आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं.

न्यायालयाने आरोपीला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI