AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जो बायडन ओसामा बिन लादेनवर हल्ला करण्याच्या विरोधात होते; बराक ओबामांचा मोठा गौप्यस्फोट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाची सध्या जगभर चर्चा सुरु आहे.

जो बायडन ओसामा बिन लादेनवर हल्ला करण्याच्या विरोधात होते; बराक ओबामांचा मोठा गौप्यस्फोट
| Updated on: Nov 18, 2020 | 12:20 AM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या पुस्तकातील प्रत्येक चॅप्टवरुन जागतिक स्तरावर मोठमोठ्या चर्चा सुरु आहेत. या पुस्तकात ओबामा यांनी पाकिस्तानातील दहशतवादी ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) याचा खात्मा करण्यासाठी राबवलेल्या मिशनबाबतची माहिती शेअर केली आहे. (Barack Obama Says Joe Biden opposed the Mission to kill Osama Bin Laden)

अमेरिकेने 2 मे 2011 रोजी अलकायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन या कुख्यात अतिरेक्याचा पाकिस्तानात शिरुन खात्मा केला होता. लादेनला पाकिस्तानात शिरुन कसं ठार केलं, याबाबत बराक ओबामा यांनी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे तसेच अमेरिकेच्या या मिशनला तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा विरोध होता, असा खळबळजनक खुलासाही या पुस्तकात करण्यात आला आहे.

ओबामा यांनी पुस्तकात म्हटलं आहे की, ओसामा बिन लादेन या दहशतवाद्यावर हल्ला करुन त्याचा खात्मा करणार ही माहिती जाणीवपूर्वक पाकिस्तानला दिली नव्हती. तसेच अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन हे तेव्हा उपाध्यक्षपदी होते. त्यावेळी त्यांनी आणि अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स यांनी या मिशनला विरोध दर्शवला होता. तरीदेखील मी पाकिस्तानला या मोहिमेत सहभागी करुन घेण्यास विरोध दर्शवला आणि त्याप्रमाणेच योजना आखली होती.

“पाकिस्तानी सैन्याचं आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचं अलकायदा आणि तालिबान या दहशतवादी संघटनांसोबत संबंध होते, ही बाब लपून राहिलेली नाही. ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये लपून बसला होता. त्याचा खात्मा करण्यासाठी जी मोहिम आखण्यात येत होती त्यात पाकिस्तानला समावेश करुन घेण्यास माझा नकार होता. कारण पाकिस्तानी सैन्याचे दहशतवादी संघटनांशी संबंध होते. पाकिस्तान अतिरेक्यांचा वापर अफगाणिस्तान आणि भारत विरोधात कारवाई करण्यासाठी वापरायचा”, अशी पोलखोल बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्ताकात केली आहे.

“आम्ही लादेनचा खात्मा करण्यासाठी गुप्त मोहिम आखली. पण या मोहिमेला तत्कालीन संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स आणि तत्कालीन उपाध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांनी विरोध केला. आमच्या या गुप्त मोहिमेची माहिती कोणालाही कळली तर मोठी संधी आमच्या हातून निसटली असती. त्यामुळे सरकारमधील फक्त मोजक्याच मंत्र्यांना या मोहिमेची माहिती देण्यात आली होती”, असं ओबामा यांनी पुस्तकात सांगितलं आहे

ओसामा बिन लादेनला कसा ठोकला?

“पाकिस्तानच्या एबोटाबादमध्ये लष्करी छावणी जवळ लादेन लपून बसला होता. पाकिस्तानी सैन्याचं अतिरेक्यांशी असलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेबाबत गोपनीयता ठेवणं मोठं आव्हान होतं. त्यामुळे लादेनला कसं मारायचं यासाठी अनेक पर्यायांचा विचार करण्यात आला. मात्र, आम्ही कोणताही पर्याय अवलंबला असता तरी पाकिस्तानला मोहिमेत सामील करुन घेतलं नसतं”, असं मत त्यांनी मांडलं आहे.

“एबाटाबाद परिसरात लादेन जिथे लपून बसला होता तिथून अवघ्या काही मैलांवर पाकिस्तानी सैन्याच्या छावण्या होत्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांना काहीह सांगितल्याने मोहिमेची माहिती लीक होण्याची शक्यता वाढली होती. याशिवाय एबोटाबादमध्ये कारवाई करण्यासाठी कोणताही पर्याय अवलंबता येईल. पण मित्रराष्ट्राच्या हद्दीत जाऊन कारवाई केल्याने राजनैतिक संबंधही धोक्यात येईल. त्यात गुंतागुंतही वाढेल, असा विचार मनात येत होता”, असं ओबामा यांनी पुस्ताकात म्हटलं आहे.

“अंतिम टप्प्यात दोन मार्गांचा विचार केला गेला. हवाई हल्ला करायचा किंवा अधिकृत मिशनची घोषणा करायची. या अंतर्गत एक टीम लपून हेलिकॉप्टरने पाकिस्तानला जाईल, परिसरात छापा मारेल आणि पाकिस्तानी सैन्य किंवा पोलिसांनी प्रत्युत्तर देण्याआधी निघून येईल. ओबामा आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमने दुसरा मार्ग अवलंबला. अखेर 2 मे 2011 रोजी पाकिस्तानमध्ये शिरुन लादेनचा खात्मा केला”, असं ओबामा यांनी सांगितलं.

“या मोहिमेनंतर जगभरातील अनेक लोकांशी मी फोनवर बातचित केली. मात्र, या सर्व लोकांमध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्याशी फोनवर बोलण्याआधी अवघडल्यासारखं वाटतं होतं. पण जेव्हा त्यांच्याशी फोनवर बातचित केली तेव्हा उलट त्यांनीच अभिनंदन केलं. त्याचबरोबर दहशतवादीविरोधी कारवायांमध्ये सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं”, असं ओबामा यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

मी लहानपणी रामायण, महाभारताच्या गोष्टी ऐकल्या होत्या; भारताविषयी कायम आकर्षण वाटायचं: बराक ओबामा

मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर कसं होणार हा प्रश्न मला पडला होता: ओबामा

वृद्ध मनमोहन सिंगांपासून राहुल गांधींना धोका नव्हता, म्हणूनच सोनियांकडून पंतप्रधानपदी निवड : ओबामा

(Barack Obama Says Joe Biden opposed the Mission to kill Osama Bin Laden)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.