मुलांच्या खेळण्यावरुन वाद, बारामतीत महिलेवर सत्तूराने वार

बारामती शहरात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा महिलेवर हल्ल्याची घटना घडली. एका महिलेवर  सत्तूराने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

मुलांच्या खेळण्यावरुन वाद, बारामतीत महिलेवर सत्तूराने वार
सचिन पाटील

|

Jun 22, 2019 | 2:38 PM

पुणे : बारामती शहरात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा महिलेवर हल्ल्याची घटना घडली. एका महिलेवर  सत्तूराने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये ही महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लोखोर आरोपी अरबाज उर्फ अबू कुरेशी याला बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

बारामती शहरातील खाटीक गल्ली येथे लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाला होता. त्यातून  अरबाज उर्फ अबू कुरेशीने तांदळवाडी येथे राहत असलेल्या जबीन गुलाब कुरेशी या महिलेच्या घरात शिरून मानेवर, तोंडावर आणि हातावर सतुराने वार केले.

यामध्ये ही महिला गंभीररित्या जखमी झाली असून या महिलेला पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बारामतीत चारच दिवसापूर्वी मटका व्यावसायिक कृष्णा जाधव यांच्या खूनप्रकरणातील आरोपी चिमी उर्फ वैष्णवी अशोक जाधव हिच्यावर खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वैष्णवी जाधवचा  पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.  याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

संबंधित बातम्या 

बारामती : भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला  

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें