AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Crime | बारामतीत चालकासह ट्रक पळवला, साडेचार कोटींच्या सिगारेटची चोरी, 7 जणांना अटक

सुपा-मोरगाव मार्गावरुन चाललेल्या ट्रकचालकाला शस्त्राचा धाक दाखवत सिगारेटने भरलेला ट्रक पळवून नेल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Baramati Crime | बारामतीत चालकासह ट्रक पळवला, साडेचार कोटींच्या सिगारेटची चोरी, 7 जणांना अटक
| Updated on: Jun 26, 2020 | 9:17 PM
Share

बारामती : सुपा-मोरगाव मार्गावरुन चाललेल्या ट्रकचालकाला (Baramati Cigarette Truck Theft) शस्त्राचा धाक दाखवत सिगारेटने भरलेला ट्रक पळवून नेल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे (Baramati Cigarette Truck Theft).

बुधवारी 24 जून रोजी हा प्रकार घडला. याबाबत झाकीर सुकामेव हुसेन या ट्रक चालकाने तक्रार दिली होती. हुसेन हे कपूर डिझेल गॅरेज प्रा. लि. कंपनीमध्ये आयशर ट्रक चालवतात. रांजणगाव एमआयडीसीतील आयटीसी सिगारेट कंपनीशी या ट्रान्सपोर्टचा माल वाहतूक करार केला आहे. हुसेन यांनी सिगारेटचा माल भरुन ते हुबळीकडे निघाले. न्हावरा, केडगाव वरुन ते सुप्याला येत पुढे मोरगाव बाजूकडे निघाले असताना अन्य एका ट्रकने त्यांना अडवत त्यांच्या ट्रकला आपला ट्रक आडवा घातला.

शस्त्रांचा धाक दाखवत ट्रक पळवला

पाच जणांनी त्यांच्या ट्रकमध्ये येत शस्त्राचा धाक दाखवत त्यांना बाजूला करत ट्रकचा ताबा घेतला. हुसेन यांचे हातपाय बांधले. डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. दुसऱ्या एका ट्रकमध्ये त्यांना मागील हौदात बसवण्यात आले. माढा तालुक्यात टेंभुर्णीजवळ कंदर या गावी त्यांच्याकडील 3,500 रुपये जबरीने काढून घेत एका मक्याच्या शेतात त्यांना सोडण्यात आले. सुमारे चार ते पाच तास ट्रकमधून त्यांना फिरवले जात होते.

दरम्यान, बुधवारी रात्री पुणे-नगर रस्त्यावर शिरुर जवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करुन हा ट्रक पकडला. अंधाराचा फायदा घेऊन आरोपी उसाच्या शेतात लपून बसले होते. यातील सात जणांना गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडून गजाआड केले. यामध्ये शिरुर पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली (Baramati Cigarette Truck Theft).

4 कोटी 71 लाखांचा मुद्देमाल पळवला

या घटनेत दरोडेखोरांनी 4 कोटी 61 लाख 88 हजार 820 रुपयांच्या सिगारेट, 3 हजार 500 रुपये रोख आणि 10 लाखांचा ट्रक पळवून नेला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या दरोड्याचा पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत दरोडेखोरांना अटक केली असल्याचे वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले.

13 जणांवर गुन्हा दाखल, 7 जणांना अटक

सदर गुन्ह्यात 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून 7 जण ताब्यात घेतले आहेत. हे सर्वजण मध्यप्रदेशातील आहेत. सुशील राजन झाला, मनोज राजाराम सिसोदिया, मनोज केसरसिंग गुडेन, दिनेश वासुदेव झाला, सतीश अंतरसिंग झाला, कल्याणसिंग सदृलसींग चौहान, ओम प्रकाश कृष्णा कृष्णा झाला अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

अटक केलेले सात जण आंतरराज्य टोळीतील दरोडेखोर असून त्यांच्याविरुद्ध कर्नाटक पश्चिम बंगाल हरियाणा उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे (Baramati Cigarette Truck Theft).

संबंधित बातम्या :

Yusuf Memon Death | मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिक जेलमध्ये मृत्यू

बुलेट गिफ्ट, अनेकवेळा पैसेही दिले, 47 वर्षीय महिलेची लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक

पुण्यात गांजा-चरस तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, 2 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.