4 आर्टिस्ट, 2292 रोपटी प्रेक्षकाच्या रुपात, प्रत्येक गाण्याला डौलत-डुलत प्रतिसाद

| Updated on: Jun 24, 2020 | 1:57 PM

स्पेनमध्ये कोरोनासाठीच्या लॉकडाऊननंतर एक आगळीवेगळी संगीत मैफिल पाहायला मिळाली (Barcelona opera house performance for plants).

4 आर्टिस्ट, 2292 रोपटी प्रेक्षकाच्या रुपात, प्रत्येक गाण्याला डौलत-डुलत प्रतिसाद
Barcelona opera house performance for plants
Follow us on

माद्रिद : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आणि त्यामुळे नाईलाजाने अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागली. यामुळे सर्वच क्षेत्र ठप्प झाली. यात चित्रपटापासून संगीत क्षेत्राचाही समावेश आहे. त्याचाच परिणाम म्हणून स्पेनमध्ये सध्या एक आगळीवेगळी संगीत मैफिल पाहायला मिळाली (Barcelona opera house performance for plants). निसर्गरम्य वातावरणात खुल्या जागेत झालेल्या संगीत मैफिली आपण नेहमीच पाहतो. मात्र, स्पेनमध्ये चक्क झाडांसाठीच विशेष मैफिल आयोजित करण्यात आली.

स्पेनमधील बार्सिलोना शहरात तेथील प्रसिद्ध बहुमजली लिसी थिएटरमध्ये 2 हजार 292 झाडांना प्रेक्षकांच्या खुर्चीवर बसवून त्यांच्यासमोर हे आगळंवेगळं संगीत सादरीकरण झालं. यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील नात्याची आनंद द्विगुणित करणारी बाजू अनेकांनी अनुभवली. या ऑपेराचं लाईव्ह स्ट्रिमिंग देखील झालं. वृक्षांसाठीच्या या खास संगीत मैफिलीचा माणसांनी मात्र, आपआपल्या घरी बसूनच अनुभव घेतला आणि या झाडांनी विशेष अतिथी म्हणून थिएटरमध्ये रसग्रहण केलं.

विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कलाकारांनी इतरवेळी माणसांना जसं अभिवादन केलं जातं तसंच अभिवादन झाडांनाही केलं. तसेच शेवटी माणसांच्या टाळ्यांऐवजी वाऱ्यांना सळसळणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज ऐकता आला. हा सर्वच अनुभव अचंबित करणारा होता. यातून निसर्गाला परतफेड करण्याची वेळ आल्याचाही संदेश देण्यात आला.

दरम्यान, स्पेनमध्ये मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे थिएटरपासून अनेक गोष्टी बंद झाल्या. आतापर्यंत स्पेनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्या 2 लाख 46 हजार 504 पर्यंत पोहचली आहे. तर 28 हजार 324 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेला स्पेनमधील हा दीर्घ लॉकडाऊन रविवारी (21 जून) उठवण्यात आला आणि लिसी थिएटर पुन्हा एकदा उघडण्यात आलं. यानंतर कोरोनाच्या या संकटातून आलेल्या अनुभवातून हा अनोखा कार्यक्रम घेण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यासाठी प्रेक्षक म्हणून आजूबाजूच्या नर्सरीतून विविध रोपं आणण्यात आली. ही रोपं कार्यक्रमानंतर बर्सिलोनामध्ये कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय योद्ध्यांना भेट म्हणून देण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

कोरोनामुळे नोकरी गेली, 4-6 लाख कमावणाऱ्या पायलटवर डिलिव्हरी बॉय होण्याची नामुष्की

दोस्त असावा तर असा! भारत-रशिया मैत्रीची रंजक कहाणी

Kung Flu | ‘कोरोना’ म्हणजे ‘कुंग फ्लू’, निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच रॅलीत ट्रम्प यांचे चीनवर शरसंधान

Barcelona opera house performance for plants