शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; वैतागलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

बीडमधील परळी शहरातील सावतामाळी नगर या ठिकाणी ही घटना समोर आली आहे. (Beed Girl Commit suicide after constantly teasing)

शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; वैतागलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

बीड : एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीला तिच्या घराशेजारीच राहणारा एका तरुण सतत छेड काढत होता. या त्रासाला कंटाळून या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीडमधील परळी शहरातील सावतामाळी नगर या ठिकाणी ही घटना समोर आली आहे. (Beed Girl Commit suicide after constantly teasing)

मिळालेल्या माहितीनुसार, परळीतील सावतामाळी या ठिकाणी पीडित मुलगी वास्तव्यास आहे. या मुलीच्या घराशेजारी आरोपी राहतो. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपी या मुलीची छेड काढत होता. या मुलीने घरात या प्रकरणी सांगितल्यावर त्याच्या घरच्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र तरीही त्या आरोपीचे तिच्या घरच्यांचे ऐकले नाही. तो सतत तिला त्रास द्यायचा. त्या पीडित मुलीला हा त्रास असाह्य झाल्याने तिने राहत्या घरातच गळफास घेतला.

या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी संभाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.

दरम्यान चार दिवसांपूर्वी नेकनूर परिसरातील येळंब येथील प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ही घटना घडली आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Beed Girl Commit suicide after constantly teasing)

संबंधित बातम्या : 

पती उत्तर प्रदेशचा तर पत्नी बंगालची, तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न करुन स्वत:ला सुतळी बॉम्बने उडवून दिले; मुंबईतील धक्कादायक घटना, प्रियकर अटकेत

Published On - 3:15 pm, Fri, 20 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI