Corona : भोपाळमध्ये 9 दिवसांच्या बाळाला कोरोना, प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांकडून संसर्ग

| Updated on: Apr 20, 2020 | 1:29 PM

भोपाळमध्ये एका 9 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 चाचणीनंतर या बाळाला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं.

Corona : भोपाळमध्ये 9 दिवसांच्या बाळाला कोरोना, प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांकडून संसर्ग
जाणून घ्या नवजात बाळाला मालिश कसे करावे !
Follow us on

भोपाळ : कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातलं (Baby Infected By Corona) आहे. कोरोना विषाणूच्या विळख्यातून कुणीही सुटलेलं नाही. भोपाळमध्ये एका 9 दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 चाचणीनंतर या बाळाला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. त्यासोबतच या मुलीच्या आई-वडिलांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, सध्या त्यांचे अहवाल (Baby Infected By Corona) प्राप्त झालेले नाही.

भोपाळच्या सुल्तानिया रुग्णालयात नऊ दिवसांपूर्वी एका बाळाचा जन्म झाला. या बाळाच्या आईची प्रसुती करणाऱ्या दोन महिला डॉक्टर कोरोनाग्रस्त असल्याचं नंतर समोर आलं होतं. त्यामुळे या दोन डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोविड-19 चाचणी करण्यात आली. त्यामध्ये या 9 दिवसांच्या बाळाचाही समावेश होता. त्यानंतर या बाळाला कोरोनाची (Baby Infected By Corona) लागण झाल्याचं समोर आलं.

प्रमुख चिकित्सा आणि आरोग्य अधिकारी प्रभाकर तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये रविवारी कोरोनाचे 27 नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या या रुग्णांच्या संपर्कात कोण-कोण आलं याचा तपास घेतला जात आहे. या सर्व कोरोनाबाधितांना सध्या चिरायू रुग्णालयात उपचारार्थ दाख करण्यात आलं आहे. भोपाळमध्ये आतापर्यंत 214 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

रविवारी भोपाळमध्ये 440 जणांच्या कोविड-19 च्या चाचण्यांचा अहवाल समोर आला. यापैकी 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहो. तर भोपाळमध्ये आतापर्यंत 34 जण कोरोनाला मात देऊन बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे भोपाळमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतकांना पूर्वीपासून कुठला ना कुठला आजार होता (Baby Infected By Corona ).

संबंधित बातम्या :

देशभरात ‘ग्रीन झोन’मधील जिल्ह्यात कोणकोणत्या क्षेत्रात अंशत: सूट?

स्थलांतरित मजुरांना आंतरराज्य प्रवासाला बंदी, रोजगारासाठी केंद्राच्या राज्यांना सूचना

गोवा कोरोनामुक्त, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

लॉकडाऊनच्या काळात 36 हजार 659 कोटी लाभार्थींच्या थेट खात्यात, किती कोटी महिलांना लाभ?