
मुंबई : फ्लिपकार्ट वेबसाईटवर 'बिग शॉपिंग डे' सेल सुरु आहे. या दरम्यान प्रत्येक कॅटेगरीमधल्या वस्तूंवर डिस्काऊंट ऑफर मिळत आहे. तसेच आयफोन 8 चा 64 जीबी व्हेरिअंट स्मार्टफोन 33 हजार 999 रुपयामध्ये मिळत आहे. जर तुमच्याकडे एचडीएफसीचे कार्ड असेल तर तुम्हाला 10 टक्के कॅशबँक मिळेल. याचा अर्थ हा स्मार्टफोन तुम्ही 32 हजार 749 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

ओप्पो एफ 11 प्रो फोन 15 हजार 999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. या फोनची किंमत 28 हजार 990 रुपये आहे. एचडीएफसी कार्ड ऑफरनंतर या फोनवर 1250 कॅशबॅक ऑफर मिळत आहे.

रिअल मी 3 प्रो 64 जीबी मेमरीचा स्मार्टफोन 9 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या फोनवरही एचडीएफसी कार्डची सूट दिली जात आहे.

रिअलमी 5 स्मार्टफोनही 8 हजार 999 रुपयात मिळत आहे. या फोनलाही एचडीएफसी कार्डद्वारे खरेदी केले, यावर तुम्हाला 1250 रुपयांची सूट मिळेल.

रेडमी K20 स्मार्टफोन 19 हजार 999 रुपयामध्ये मिळत आहे. यावरही एचडीएफसी कार्डच्या माध्यमातून 1250 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळत आहे. ही किंमत 6 जीबी रॅम आणि 64 जीबी व्हेरिअंटसाठी आहे.

रेडमी नोट 7 एस स्मार्टफोन तुम्ही सेलच्या दरम्यान 8 हजार 999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. डेबिट कार्डचा वापर केला, तर हा फोन तुम्ही 7 हजार 749 रुपयामध्ये खरेदी करु शकता.

विवो झेड 1 एक्स चा 4 जीबी रॅमचा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर तुम्ही 14 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. त्यासोबतच तुम्हाला कार्ड ऑफरही मिळणार ज्यामध्ये 1250 रुपयांची सूट मिळेल.