
Bigg Boss 14 : मुंबई : ‘बिग बॉस’च्या नवीन सीजनबाबत चर्चा सुरु झाली आहे (Bigg Boss 14). ‘बिग बॉस-14’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. नुकतंच याचा एक 22 सेकंदांचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसचं नवीन पर्व येत्या 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बिग बॉसमध्येही अनेक बदल पाहायला मिळू शकतात (Bigg Boss 14).
‘बिग बॉस-14’चं ग्रँड प्रीमिअर 27 सप्टेंबरला कलर्स टीव्हीवर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या कार्यक्रमाचं शूटिंग ऑन-एअर व्हायच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 25 आणि 26 सप्टेंबरला होईल. 26 सप्टेंबरला स्पर्धक बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतील. हा कार्यक्रम टीव्हीवर 27 सप्टेंबरपासून ऑन एअर होईल. मात्र, सध्या याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सलमान एका एपिसोडसाठी किती मानधन घेणार?
‘बिग बॉस 14’चा सेट मुंबईतील फिल्म सिटीमध्ये असेल. इथे महत्त्वाची खबरदारी घेतली जाईल. होस्ट म्हणून अभिनेता सलमान खान या महिन्यातच शोचं शूटिंग सुरु करेल. यंदाचा बिग-बॉस कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लॉकडाऊनच्या थीमवर असेल. या नवीन पर्वात सलमान खान एका एपिसोडसाठी तब्बल 16 कोटी रुपये घेणार असल्याची चर्चा आहे.
लॉन्च करण्यात आलेल्या टीझरचा काही भाग सलमान खानच्या फार्महाऊसवर शूट केल्याची माहिती आहे. बिग बॉसचा प्रोमो ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे (Bigg Boss 14).
प्रोमोच नाही, तर अँकर लिंक्सची शूटिंगही सलमानच्या फार्महाऊसवर केली जाईल. कार्यक्रमाची एक टीम तिथे जाऊन शूट करेल. सलमान खान स्पर्धकांसोबत लाईव्ह संवाद साधेल, जेव्हा ते बिग-बॉसच्या घरात असतील.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिग-बॉसच्या घरात स्वच्छतेवर भर
मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सेटवर ग्रीन झोन आणि रेड झोन असतील. जिथे लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करावं लागेल. या सेटला डायरेक्टर ओमंग कुमार यांनी डिझाइन केलं आहे. याचं काम गेल्या महिन्यातच सुरु झाल्याची माहिती आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत बिग-बॉसचं घर तयार होऊन जाईल. यंदा बिग-बॉसच्या घरात स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आला आहे. घरात जे कोणी स्पर्धक येतील त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. सोबतच त्यांच्या ट्रव्हल हिस्ट्रीमध्ये आंतराष्ट्रीय स्थळांचीही माहिती घेतली जाईल.
यंदा शोमध्ये 16 स्पर्धक असतील. यापैकी 13 सेलिब्रिटी आणि इतर 3 स्पर्धक सामान्य व्यक्ती असतील. आतापर्यंत यासाठी 30 जणांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे.
कोणाच्या नावाची चर्चा?
यंदाच्या पर्वात सर्वाधिक चर्चा ही टीव्ही अभिनेत्री जास्मीन भसीनची आहे. तिच्याशिवाय, नेहा शर्मा, विवियन डीसेना, हर्ष बेनीवाल, निया शर्मा याचंही नाव यादीत आहे (Bigg Boss 14).
संबंधित बातम्या :
सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृतदेहावर कपडे नव्हते, पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये खुलासा
65 वर्षांवरील कलाकारांना पुन्हा शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा आदेश हायकोर्टाने बदलला