Bihar Election Result 2020 | सुशांतसिंह राजपूतचा भाऊ नीरजकुमारला आघाडी की पिछाडी?

| Updated on: Nov 10, 2020 | 12:47 PM

छातापूर मतदारसंघातून नीरजकुमार सिंह बबलू यांनी मोठ्या मताधिक्याने आघाडी मिळवली आहे.

Bihar Election Result 2020 | सुशांतसिंह राजपूतचा भाऊ नीरजकुमारला आघाडी की पिछाडी?
Follow us on

Bihar Election Result 2020 LIVE पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेणारे त्याचे चुलतभाऊ नीरजकुमार सिंह बबलू (Niraj Kumar Singh Bablu) यांच्या निकालाकडेही देशाचं लक्ष आहे. छातापूर (Chhatapur) मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे नीरजकुमार सिंह सध्या मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. (Bihar Election Result 2020 Sushant Singh Rajput cousin Niraj Kumar Singh Bablu Result LIVE Updates)

छातापूर मतदारसंघातून 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नीरजकुमार सिंह बबलू यांनी मोठ्या मताधिक्याने आघाडी मिळवली आहे. राजदच्या विपीन कुमार सिंह यांचे मुख्य आव्हान त्यांच्यासमोर आहे. बसप, राष्ट्रवादी आणि एमआयएमचे उमेदवारही त्यांच्याविरोधात उभे आहेत. तर बारा अपक्ष उमेदवारांनी नीरजकुमारांना आव्हान दिले आहे.

चौथ्यांदा आमदारकी मिळवणार का?

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतही नीरजकुमार यांनी भाजपकडून निवडणूक लढवत राजदच्या जहूर आलम यांचा 9,292 मतांनी पराभव केला होता. नीरजकुमार यांना त्यावेळी 43.71% मतदारांनी कौल दिला होता.

विशेष म्हणजे, 2010 मध्ये नीरजकुमार जेडीयूच्या तिकीटावर विजयी झाले होते. त्यावेळी राजदच्या अकील अहमद यांचा नीरजकुमारांनी पराभव केला होता. मात्र त्यानंतर नीरजकुमारांनी भाजपचा झेंडा हाती धरला.

51 वर्षीय नीरजकुमार हे सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर 2005 मध्ये ते राघोपूर मतदारसंघातून आमदार झाले, त्यानंतर सलग दोन वेळा ते छातापूरचे आमदार झाले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात नीरजकुमार सिंह बबलू यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. प्रचारादरम्यान छातीदुखीचा त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

छातापूर मतदारसंघाची मतदारसंख्या

2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण 2,92,902 पात्र मतदार होते. त्यापैकी 1,53,879 पुरुष, 1,38,806 महिला आणि तृतीय लिंगाचे 7 मतदार होते. या विधानसभा मतदारसंघात अंदाजे अनुसूचित जातींची लोकसंख्या 16.37% आहे. हा मतदारसंघ असलेल्या सुपौल जिल्ह्यातील साक्षरतेची टक्केवारी 57.67% आहे. (Bihar Election Result 2020 Sushant Singh Rajput cousin Niraj Kumar Singh Bablu Result LIVE Updates)

संबंधित बातम्या :

‘बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत आल्यास सुशांत मृत्यूप्रकरणातील कारस्थानाचा पर्दाफाश करु’

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं, कार्यालयाबाहेर मोदी जिंदाबादच्या घोषणा

बिहार निवडणुकांतील यश आणि विजय फडणवीसांमुळे, निकालापूर्वीच प्रसाद लाड यांच्याकडून श्रेय

(Bihar Election Result 2020 Sushant Singh Rajput cousin Niraj Kumar Singh Bablu Result LIVE Updates)