बिहारचे अर्थमंत्री तारकिशोर प्रसाद करोडपती, त्यांची LIC आणि सोन्यातही गुंतवणूक

सर्वसामान्य नागरिकांसाठी एखाद्या राजकीय नेत्याची संपत्ती किती? हा प्रश्न नेहमीच उत्सुकतेचा असतो (Bihar finance minister Tarkishor Prasad property).

बिहारचे अर्थमंत्री तारकिशोर प्रसाद करोडपती, त्यांची LIC आणि सोन्यातही गुंतवणूक

पाटणा : सर्वसामान्य नागरिकांसाठी एखाद्या राजकीय नेत्याची संपत्ती किती? हा प्रश्न नेहमीच उत्सुकतेचा असतो. बिहारमध्ये नुकतीच निवडणूक पार पडली. निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला उमेदावारांनी संपत्तीची माहिती देणं अनिवार्य आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवार आपल्या संपूर्ण संपत्तीची माहिती देतो. बिहारमध्ये आता निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सत्ताही स्थापन झाली आहे. उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारच्या अर्थखात्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या या नेत्याची संपत्ती किती? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत (Bihar finance minister Tarkishor Prasad property).

एडीआरच्या रिपोर्टनुसार, बिहार विधानसभा निवडणुकी दरम्यान निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या माहितीनुसार तारकिशोर प्रसाद यांचा व्यवसाय शेती आणि व्यापार आहे. त्यांची एकूण 1,89,40,307 रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये त्यांची 49.4 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांचं 3.7 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे.

एलआयसीमध्ये गुंतवणूक

एडीआरच्या रिपोर्टनुसार, तारकिशोर प्रसाद यांनी एलआयसी या सरकारी विमा कंपनीत 3 लाख रुपये गुंतवणूक केली आहे. त्यांच्याजवळ बोलेरो, स्कॉर्पिओ, इन्होव्हा, टाटा इंडिगा सारख्या गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत 20 लाख रुपये आहे (Bihar finance minister Tarkishor Prasad property)..

सोन्यातही गुंतवणूक

तारकिशोर प्रसाद यांनी सोन्यातही गुंतवणूक केली आहे. त्यांनी जवळपास 22.50 लाख रुपयांची गुंतवणूक सोन्यात केली आहे. यामधील 50 ग्रॅम गोल्डची किंमत अडीच लाख तर 400 ग्रॅम गोल्डची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे. आता बिहारचे वित्तमंत्री तारकिशोर प्रसाद बिहार राज्याची आर्थिक व्यवस्था कशी सांभळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बिहारमध्ये खातेवाटप जाहीर

बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. जेडीयू नेते नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर भाजप नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी उपमुख्यमंत्री बनले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या या सरकारचं आज (17 नोव्हेंबर) खातेवाटप जाहीर झालं. उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तारकिशोर प्रसाद यांचं आगामी काळात आर्थिक धोरण कसं असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा : नितीश सरकारचे खातेवाटप जाहीर, फडणवीसांप्रमाणे गृह विभाग स्वतःकडे, भाजपला कोणती खाती?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI