बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या ‘कोरोना’ लढ्याचं कौतुक, ‘आरोग्यसेतू अॅप’चीही स्तुती

| Updated on: Apr 23, 2020 | 8:50 AM

तुमचं नेतृत्व, तुमच्या सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचं कौतुक करतो, असं बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे (Bill Gates appreciates PM Narendra Modi measures handling corona pandemic)

बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या कोरोना लढ्याचं कौतुक, आरोग्यसेतू अॅपचीही स्तुती
Follow us on

न्यूयॉर्क : ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘कोरोना’सोबतच्या लढ्यात केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं आहे. गेट्स यांनी मोदींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोरोना रुग्णांविषयी माहिती देणाऱ्या ‘आरोग्यसेतू अॅप’चीही बिल गेट्स यांनी स्तुती केली आहे. (Bill Gates appreciates PM Narendra Modi measures handling corona pandemic)

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच उपाययोजना आखत कठोर निर्णय घेतल्यामुळे भारतातील कोरोनाच्या संसर्ग दरात घट दिसत आहे. हे संपूर्ण जगासाठी आदर्श उदाहरण आहे. तुमचं नेतृत्व, तुमच्या सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचं कौतुक करतो.’ असं बिल गेट्स म्हणतात.

‘तुमच्या सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेणं, क्वारंटाईन करणं, हॉटस्पॉट ओळखण्यासाठी चाचण्या वाढवणं, आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणं, असे घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत, असं गेट्स यांनी पत्रात लिहिलं आहे.

हेही वाचा : पंतप्रधानांची तिसऱ्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, 3 मेनंतरच्या रणनीतीविषयी चर्चेची शक्यता

‘मला खरंच आनंद आहे, तुमचं सरकार ‘कोविड-19′ शी लढण्यासाठी असामान्य डिजिटल क्षमतांचा पूर्णपणे वापर करत आहे. कोरोना व्हायरस ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि जनतेला आरोग्य सेवांशी जोडण्यासाठी आरोग्य सेतू डिजिटल अॅप लॉंच करण्याचे उत्तम निर्णय घेतले आहेत’ अशी स्तुतिसुमनेही गेट्सनी उधळली आहेत.