AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar | शरद पवारांना बसणार आणखी एक मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याची भाजपच्या दिशेने वाटचाल ?

भारतीय जनता पक्ष शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची भाजपमध्ये जाण्याच्या दिशेने हालचाल सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चादेखील सुरू आहे.

Sharad Pawar | शरद पवारांना बसणार आणखी एक मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याची भाजपच्या दिशेने वाटचाल ?
| Updated on: Feb 19, 2024 | 11:17 AM
Share

मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 :  भारतीय जनता पक्ष शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची भाजपमध्ये जाण्याच्या दिशेने हालचाल सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चादेखील सुरू आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. हा बडा नेता कोण आणि शरद पवार गटाची यावर खेळी काय असले याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसला मोठे धक्के

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक मोठे नेते, माजी आमदार पक्षांतर करताना दिसत आहेत. महाविकास आघआडीतील पक्षांमध्ये मोठी गळती सुरू असून काही दिवसांपूर्वी काँग्रेसला लागोपाठ मोठे धक्के बसले. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि गेल्या आठवड्यात अशोक चव्हाण यांसारखे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी एकामागोमाग एक पक्षाला रामराम ठोकला.

शरद पवार गटाचा नेता भाजपच्या वाटेवर

आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसणार असल्याची माहिती आहे. भाजपमध्ये अनेक मोठे नेते गेल्या काही काळात आले आहेत. आता भाजपने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आणखी मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांचा निकटवर्तीय असलेला आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या काही काळात, लवकरच तो नेता भाजपवासी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असं झालं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठं खिंडार पडेल. आता हा मोठा नेता कोण आणि तो खरचं शरदप पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये जातो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 42पेक्षा अधिक जागा जिंकायच्या असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ( शरद पवार गट) मोठे नेते आपल्यासोबत आणले पाहिजेत, तरच हे शक्य होईल अशी भाजपची भूमिका आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...