ब्रेन स्ट्रोकनंतर अभिनेता राहुल रॉय आयसीयूबाहेर, स्पीच थेरपी सुरु

| Updated on: Dec 02, 2020 | 4:14 PM

राहुल रॉयला आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे. त्याच्यावर फिजिकल आणि स्पीच थेरपी करण्यात येत आहे.

ब्रेन स्ट्रोकनंतर अभिनेता राहुल रॉय आयसीयूबाहेर, स्पीच थेरपी सुरु
Follow us on

मुंबई: कारगिलमध्ये शूटिंग करताना ब्रेन स्ट्रोक (मेंदूघाताचा झटका) आलेला प्रख्यात अभिनेता राहुल रॉयच्या (Rahul Roy) प्रकृतीत काहीशी सुधारणा होत आहे. राहुल रॉयला आयसीयूबाहेर आणण्यात आले असून त्याच्यावर स्पीच थेरपी करण्यात येत आहे. (Bollywood Actor Rahul Roy shifted outside ICU to undergo speech therapy)

राहुल रॉयला आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे. त्याच्यावर फिजिकल आणि स्पीच थेरपी करण्यात येत आहे. राहुलची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती त्याचा मेहुणा रोमीरने दिली. राहुलची प्रकृती पूर्णपणे सुधारण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. राहुल रॉयच्या सुदृढ आरोग्यासाठी चाहते सोशल मीडियावर प्रार्थना करत आहेत.

कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचं शूटिंग करताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राहुलची प्रकृती गंभीर झाल्याने सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज आहे.

राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर तातडीने कारगिल येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला सैन्याच्या मदतीने श्रीनगर येथे हेलिकॉप्टरने आणण्यात आलं. तर तिथून मुंबईच्या नानावटी रुग्णालयात हलवण्यात आलं.

एलएसी- लिव्ह द बॅटल या चित्रपटामध्ये ‘बिग बॉस’ फेम निशांत मालकानीही काम करत आहे. ‘राहुल रॉय यांना मंगळवारी स्ट्रोक आला. आम्ही सर्व सोमवारी रात्री झोपायला गेलो, तेव्हा ते बरे होते. मला वाटतं की, त्यांची तब्येत हवामानामुळे खराब झाली. कारण आम्ही शूट करतो त्या कारगिलमधील भागात तापमान -15 अंश आहे’ असं निशांतने सांगितलं होतं.

‘आशिकी’ चित्रपटामुळे राहुल रॉय लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. ‘आशिकी’ चित्रपटानंतर राहुल रॉयने तब्बल 47 चित्रपट साईन केले. मात्र, त्यानंतर तो हिंदी चित्रपटसृष्टीपासून दुरावला. मध्यंतरी छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वा सहभागी होऊन त्याने विजेतेपदही पटाकवलं होतं. परंतु त्यानंतर तो पुन्हा लाईमलाईटपासून दूर गेला.

संबंधित बातम्या :

ब्रेन स्ट्रोकनंतर राहुल रॉयची प्रकृती स्थिर, नानावटी रुग्णालयात उपचार सुरू

अभिनेता राहुल रॉयला कारगिलमध्ये शूटिंगवेळी ब्रेन स्ट्रोकचा झटका

(Bollywood Actor Rahul Roy shifted outside ICU to undergo speech therapy)